घरदेश-विदेशमलिकांचा तुरुंगातील मुक्काम वाढला

मलिकांचा तुरुंगातील मुक्काम वाढला

Subscribe

सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली, 6 मेपर्यंत न्यायालयीन कोठडी

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना शुक्रवारी दुहेरी दणका बसला. एका बाजूला सर्वोच्च न्यायालयाने अंमलबजावणी संचालनालया (ईडी)च्या कारवाईविरोधातील त्यांची याचिका फेटाळून लावली, तर दुसरीकडे विशेष पीएमएलए न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडी 14 दिवसांनी म्हणजेच 6 मेपर्यंत वाढवली आहे. त्यामुळे नवाब मलिक यांचा आर्थर रोड तुरुंगातील मुक्काम वाढला आहे.

ईडीच्या कारवाईविरोधातील याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने नवाब मलिक यांना दिलासा दिला नव्हता. या निर्णयाला मलिक यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान देत तातडीच्या सुटकेची मागणी केली होती. मलिकांच्या याचिकेवर शुक्रवारी न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठापुढे सुनावणी झाली. नवाब मलिकांच्या वतीने ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला, मात्र याप्रकरणी तपास अद्याप सुरू असल्याने तूर्तास यात आम्ही हस्तक्षेप करू इच्छित नाही. तुम्ही नियमित कोर्टात रितसर जामिनासाठी अर्ज करू शकता, असे म्हणत सर्वोच्च न्यायालयाने मलिक यांची याचिका फेटाळून लावली.

- Advertisement -

त्याचबरोबर मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टाने नवाब मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ करीत पुढील सुनावणी 6 मेपर्यंत तहकूब केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -