घरताज्या घडामोडीलोकल ट्रेनमधील घटनेवर राज्य महिला आयोग आक्रमक; महिलांच्या सुरक्षतेबाबत पोलिसांना पत्र

लोकल ट्रेनमधील घटनेवर राज्य महिला आयोग आक्रमक; महिलांच्या सुरक्षतेबाबत पोलिसांना पत्र

Subscribe

मुंबईत धावत्या लोकलमध्ये परिक्षेला निघालेल्या विद्यार्थीनीवर एका नराधमाने अत्याचार करण्याचा प्रयत्न केला, ही घटना अत्यंत संतापजनक आहे. बुधवारी सकाळी सीएसएमटी येथून पनवेलच्या दिशेने निघालेल्या 7.28 वाजताच्या ट्रेनमध्ये ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी आठ तासांत आरोपीला अटक केली आहे. दरम्यान या घटनेची राज्य महिला आयोगाकडून दखल घेण्यात आली असून महिलांच्या सुरक्षतेबाबत पोलिसांना पत्र देण्यात आलं आहे.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी रेल्वे पोलिसांनी पत्र लिहून महिलांच्या सुरक्षतेबाबत निर्देश देण्यात आले आहेत. काल मुंबई लोकलच्या हार्बर मार्गावर परीक्षेला जात असताना विद्यार्थिनीची धावत्या लोकलमध्ये छेड करण्यात आली याची दखल राज्य महिला आयोगाने घेतलेली असून,यामध्ये सी.एस.एम.टी रेल्वे पोलीस स्टेशनला पत्र व्यवहार केलेला आहे.यामध्ये तपास अधिकारी पीएसआय श्रीमती मतकट्टे यांच्याशी संपर्क साधला असता काल सायंकाळी आरोपीला ताब्यात घेण्यात आलेले असून,आरोपीवर गुन्हे देखील दाखल झालेले आहेत आणि आरोपीला आज दुपारी तीन वाजता न्यायालयात सादर करण्यात येत आहे.खरंतर लाखो महिला लोकलने प्रवास करतात आणि यामध्ये महिलांच्या सुरक्षिततेच्या बाबत निश्चितपणाने काळजी घेणे गरजेचे असून, संबंधित यंत्रणेला देखील त्या पद्धतीचा सूचना देण्यात आलेल्या आहेत. महिलांची सुरक्षितता ही फार महत्त्वाची असून संबंधित विभागाने तातडीने यावर उपाययोजना कराव्यात असे निर्देश राज्य महिला आयोगाच्या वतीने देण्यात आलेले आहेत.

- Advertisement -

काय आहे प्रकरण ?

मुंबईतील गिरगाव येथे वास्तव्यास असलेली तरुणी ही बुधवारी (ता. 14 जून) सकाळी बेलापूर येथे परीक्षेस जाण्यास निघाली होती. यावेळी या तरुणीने 7.28ची सीएसएमटी-पनवेल लोकल पकडली. यावेळी ती महिलांच्या सेकंड क्लासच्या डब्यातून प्रवास करत होती. त्याचवेळी ट्रेन सुरू होताच हा आरोपी त्या डब्यात चढला. यावेळी सदर तरुणी एकटीच असल्याचा फायदा घेत या नराधमाने तिच्यावर अत्याचार केला. त्यावेळी तरुणीने स्वतःचा बचाव करण्याचा देखील प्रयत्न केला. पण त्यानंतर तरुणीने आराडाओरडा करण्यास सुरुवात करताच आरोपीने मस्जिद बंदर स्थानक येताच तिथून पळ काढला.

- Advertisement -

या घटनेनंतर घाबरलेल्या तरुणीने या घटनेची माहिती आरपीएफला (रेल्वे सुरक्षा दल) देत तक्रार दाखल केली. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तत्काळ कारावई करत पीडित तरुणीच्या सांगण्यावरून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला. यानंतर आरपीएफ, जीआरपी, क्राईम ब्रान्च आणि मुंबई पोलिसांनी पथके तयार करुन आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली. पीडित तरुणीने सांगितल्याप्रमाणे पोलिसांनी मस्जिद बंदर रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही कॅमेरांची तपासणी करून आरोपीची ओळख पटवली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली.


हेही वाचा : Bacchu Kadu : बच्चू कडूंना धक्का, प्रहारच्या नेत्याचा वंचितमध्ये


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -