घरमहाराष्ट्रनापास झाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या

नापास झाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या

Subscribe

नापास झाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या

सिव्हिल डिप्लोमाच्या प्रथम वर्षाच्या परिक्षेत पाच विषयात नापास झालेल्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना जळगाव जिल्ह्यात घडली आहे. साहील राजू तडवी (१७) असे या विद्यार्थाचे नाव असून हा शासकीय पॉलिटेक्निक महाविद्यालयात शिकत होता. आपण पाच विषयात नापास झाल्याचे समजताच साहीलने राहत्या घरी गळफास लावून आपले आयुष्य संपवले.

नेमके काय घडले?

जळगावमधील लक्ष्मीनगरात तडवी हे कुटुंब राहते. साहील याचे वडील राजू हे बांधकाम विभागात शिपाई म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा मोठा मुलगा साहिल हा शासकीय पॉलिटेक्निक महाविद्यालयात सिव्हील डिप्लोमाच्या पहिल्या वर्षाला शिक्षण घेत होता. मंगळवारी सर्व कुटूंबीय रात्री घरात झोपलेले होते. त्यानंतर साहील वरच्या मजल्यावर झोपायला गेला. तो रात्री १२ वाजेपर्यंत मित्रांशी सोशल मीडियावर चॅटींग करीत होता. सकाळ झाल्यानंतर साहीलचा छोटा भाऊ साहीलला उठवण्यासाठी गेला. मात्र दादा दरवाजा उघडत नाही हे पाहून त्याने खिडकीतून पाहीले असता साहीलने गळफास लावल्याचे दिसले. हा सर्व प्रकार साहीलच्या भावाने कुटुंबियांना सांगितला. या घटनेमुळे साहीलच्या कुटुंबियांना जबरदस्त धक्का बसला.

- Advertisement -

सुसाइड नोटमध्ये काय लिहीले होते?

आत्महत्या करण्यापूर्वी साहीलने एक सुसाइड नोट लिहून ठेवली होती. त्या सुसाइड नोटमध्ये साहीलने असे लिहीले होते की, माझा रात्री निकाल लागला असून मी पाच विषयात नापास झालो असल्याने मी आत्महत्या करत आहे. त्यासाठी कोणालाही जबाबदार धरु नये.

Pradnya Ghogalehttps://www.mymahanagar.com/author/pradnya/
पत्रकारितेत ५ वर्ष पूर्ण. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. सामाजिक, आरोग्यविषयक विषयांवर लिहिण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -