घरताज्या घडामोडीनगराध्यक्ष, सरपंचपदासाठी थेट निवडणूक घ्या, सुधीर मुनगंटीवार यांची मागणी

नगराध्यक्ष, सरपंचपदासाठी थेट निवडणूक घ्या, सुधीर मुनगंटीवार यांची मागणी

Subscribe

राज्यातील नगरपालिका आणि नगर पंचायतींचे अध्यक्ष तसेच ग्रामपंचायत सरपंचपदासाठी थेट निवडून घ्यावी, अशी मागणी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. त्यांनी या मागणीच्या संदर्भातील पत्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे.

राज्यात फडणवीस सरकार असताना नगराध्यक्ष आणि सरपंचपदासाठी थेट निवडणूक घेण्यात आली होती. मात्र, २०१९ मध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आघाडी सरकार आल्यानंतर आघाडीने फडणवीस सरकारचा निर्णय रद्द करून नगराध्यक्ष आणि सरपंचपदासाठी पूर्वीप्रमाणे निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला. आता राज्यात सत्तांतर झाल्यानंतर भाजपकडून पुन्हा एकदा नगराध्यक्ष आणि सरपंचपदासाठी थेट निवडणूक घेण्याची मागणी केली आहे.

- Advertisement -

स्थानिक स्वराज्य संस्थांची प्रभाग रचना दुरस्त करा: बावनकुळे यांची मागणी

महाविकास आघाडी सरकारच्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रभाग रचनांची निर्मीती सदोष पद्धतीने झाली असून ती रद्द करावी, अशी मागणी भाजपचे आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. त्यांनी या बाबतचे पत्र राज्य निवडणूक आयोगाला दिले आहे.

- Advertisement -

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर प्रभाग रचना तसेच आरक्षण या संदर्भामध्ये गेल्या दोन महिन्यांपासून प्रक्रिया सुरू आहे. आता ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात असतानाच भाजपने सर्व प्रभाग रचना रद्द करण्याची मागणी केली आहे. ही मागणी सरकारने मागणी मान्य केली तर निवडणुका आणखी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

शासकीय अधिकाऱ्यांवर दबाव टाकून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आपल्या सोयीने प्रभाग रचना केल्या आहेत. त्यामुळे प्रभाग रचना रद्द करावी अशी आमची मागणी केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रभाग रचना झाल्या. मात्र त्या सदोष पद्धतीने झाल्या आहेत. त्यावर हजारो हरकती आलेल्या आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार कसे निवडून येणार याचा प्रयत्न केला गेला. त्यामुळे आम्ही राज्य निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे, असे बावनकुळे यांनी सांगितले.


हेही वाचा : महामंडळातही आरपीआयला स्थान मिळावे, रामदास आठवलेंनी घेतली उपमुख्यमंत्र्यांची भेट


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -