घरमहाराष्ट्रएमपीएससी परीक्षा नापास झालेल्या तरुणाची आत्महत्या

एमपीएससी परीक्षा नापास झालेल्या तरुणाची आत्महत्या

Subscribe

एमपीएससी परीक्षेत पास होेऊ न शकल्यामुळे पुण्यातील एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अमर मोहिते असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

अमर मोहिते हा पुण्यातील सदाशिव पेठेत राहत होता. मागील 2 वर्षांपासून तो पोलीस उपनिरीक्षकाची तयारी करत होता. शारीरिक क्षमता चाचणीत केवळ एक गुण कमी पडल्याने त्याची संधी हुकली होती, अशी माहिती त्याच्या मित्रांनी दिली आहे. काल मित्रांना भेटला त्यावेळी तो निराश वाटला. त्यातूनच आज त्याने रूमवर आत्महत्या केली. या घटनेनंतर सध्या त्याच्या नातेवाईकांमधून हळहळ व्यक्त केली जात आहे.

- Advertisement -

जीवनात यश-अपयश येत असते. पण, त्याने खचून जात कामा नये. कोरोनासारख्या संकटकाळात अनेकांना समस्यांचा सामना करावा लागला. पण, अशावेळी संयम न ढळता अनेकांनी यातून सावरत पुढे जाण्याचा यशस्वी प्रयत्न देखील केला. पण, अमरने असे का केले? हाच प्रश्न अनेकांना पडला आहे. समस्या या कायम असतात. पण, त्यावर उपाय देखील आहेत. त्यामुळे अमरने उचललेल्या या टोकाच्या पावलानंतर आत्महत्या ही कायमच्या समस्येवरचा तात्पुरता उपाय आहे अशीच प्रतिक्रिया सध्या अमरच्या आत्महत्येनंतर प्रत्येक जण देताना दिसत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -