घरमहाराष्ट्रशिवसेनेसोबत आमची युती फक्त महाराष्ट्रात

शिवसेनेसोबत आमची युती फक्त महाराष्ट्रात

Subscribe

शिवसेनेसोबत आमची युती फक्त महाराष्ट्रात आहे, इतर राज्यातील युतीबाबत हायकमांड निर्णय घेईल. येणारी निवडणूक ठरवेल कोणाला किती जागा द्यायच्या, असा खोचक टोला काँग्रेस नेते विजय वड्डेट्टीवार यांनी संजय राऊत यांना लगावला आहे.

गोव्यात काँग्रेसला आत्मविश्वास नडणार असून, गोव्यात काँग्रेसचा एक अंकी आमदार येणार असल्याच्या संजय राऊत यांच्या टीकेचा वडेट्टीवार यांनी भंडार्‍यात समाचार घेतला. ते भंडार्‍यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक प्रचारादरम्यान बोलत होते. संजय राऊत यांचे एक अंकी आमदार हे वक्तव्य त्यांच्या शिवसेना पक्षाशी संबंधित असल्याचे वडेट्टीवार यावेळी म्हणाले.

- Advertisement -

आमची युती फक्त महाराष्ट्रात झाली असून आम्ही केवळ सत्तेत सोबत आहोत. त्यामुळे गोवा व इतर राज्यातील युतीबाबत काँग्रेस हायकमांड निर्णय घेणार आहे. त्यामुळे कोणाशी युती केल्याने कोणाच्या जागा वाढतील हे येणारी निवडणूक ठरवेल, असा खोचक टोला मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना लगावला आहे.

शिवसेनेला युपीएमध्ये समाविष्ट करून घेण्यासंबंधी लोकसभेच्या निवडणुका लागताच काँग्रेस हायकमांड निर्णय घेईल. संजय राऊत यांच्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याशी भेटीगाठी होत असून लवकर शिवसेनेचा युपीएमध्ये समावेश होणार असल्याचा विश्वासही यावेळी विजय वड्डेट्टीवार यांनी व्यक्त केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -