घरमहाराष्ट्रपुणेSupriya Sule : MVA चा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, उमेदवारही जाहीर करू- सुप्रिया...

Supriya Sule : MVA चा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, उमेदवारही जाहीर करू- सुप्रिया सुळे

Subscribe

यावेळी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना इंडिया आघाडीमध्ये मोठी जबाबदारी दिली जाईल, ते राज्यासह देशपातळीवरचे नेते आहेत. आंबेडकर कुटुंबीयांचे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात मोठं योगदान आहे.

पुणे : नवीन वर्षानिमित्त खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे येथे पत्रकार परिषद घेऊन जा सोमवारी (1 जानेवारी) माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉम्युला ठरला असून, पुढील आठ ते दहा दिवसांत तो जाहीर केला जाणार असल्याचेही माहिती माध्यमांना दिली. (Supriya Sule MVAs seat allotment formula has been decided candidates will also be announced Supriya Sule)

यावेळी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना इंडिया आघाडीमध्ये मोठी जबाबदारी दिली जाईल, ते राज्यासह देशपातळीवरचे नेते आहेत. आंबेडकर कुटुंबीयांचे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात मोठं योगदान आहे. तर महाविकास आघाडीतील जागा वाटपाबाबत बोलताना सुळे म्हणाल्या की, महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉम्युला ठरला आहे. त्याची औपचारिक घोषणा व्हायची आहे. याला पुढील आठ ते दहा दिवस लागतील असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी जागा वाटप झाल्यानंतर उमेदवारही जाहीर केले जाणार असल्याचेही सुळे यांनी यावेळी सांगितले.

- Advertisement -

हेही वाचा : Japan Earthquake : जपानमध्ये 7.6 रिश्टर स्केलचा भूकंप; त्सुनामीचा इशारा

जागावाटपाच्या प्रश्नावर बोलताना सुप्रिया सुळेंनी सांगितले की, काही दिवसांपूर्वी नवी दिल्लीत ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यात महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत सर्व पक्षांचे वरिष्ठ नेते सहभागी झाले होते. या बैठकीत जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. अनौपचारिक पद्धतीने त्यावर शिक्कामोर्तबही झालं आहे. केवळ त्याची अधिकृत घोषणा करणं बाकी आहे. येत्या 8-10 दिवसांत त्याची अधिकृत घोषणा केली जाईल अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

- Advertisement -

हेही वाचा : Supriya Sule : पवार- ठाकरेंवर टीका केल्याशिवाय हेडलाइन होत नाही; सुळेंचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा

जयंत पाटील यांनीही दिला दुजोरा

खासदार सुप्रिया सुळे यांनी दिलेल्या माहितीनंतर शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीदेखील यावर भाष्य केलं आहे. पाटील म्हणाले, येत्या एक-दोन दिवसांत जागावाटपाचं चित्र स्पष्ट होईल. तिन्ही पक्षांच्या वरिष्ठांची दिल्लीत एक बैठक झाली आहे. काँग्रेसच्या पक्षांतर्गत काही बैठका दिल्लीत पार पडल्याची माहिती माझ्यापर्यंत आल्याचेही जयंत पाटील यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -