घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रपोलिसांची तत्परता : हरवलेली गतिमंद मुलगी पालकांच्या स्वाधीन

पोलिसांची तत्परता : हरवलेली गतिमंद मुलगी पालकांच्या स्वाधीन

Subscribe

काळाराम मंदिर परिसरात एक गतिमंद मुलगी सापडली होती. त्या मुलीस पंचवटी पोलिसांनी अवघ्या काही तासांत तिच्या पालकांच्या स्वाधीन केले. मुलगी सुखरूप मिळाल्याने आश्रू अनावर झालेल्या पालकांना पंचवटी पोलिसांची मनोमन आभार मानले. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळख दाखवलेल्या तत्परतेबद्दल पंचवटी पोलिसांचे स्तरातून कौतुक केले जात आहे.

पोलिसांनी दिलेली माहितीनुसार, काळाराम मंदिर परिसरात गुरुवारी (दि.२८) रात्री आठ वाजेदरम्यान गतिमंद मुलगी मिळून आली होती. त्या मुलीस नाव व पत्ता विचारले. मात्र, ती गतिमंद असल्याकारणाने नाव पत्ता सांगत नव्हती. ही बाब जागरूक नागरिकाच्या लक्षात आली.

- Advertisement -

पोलीस आयुक्तांच्या संकल्पनेतून पंचवटी पोलिस ठाणे स्तरावर वेगवेगळे व्हाट्सअ‍ॅप ग्रुप तयार करण्यात आले आहेत. या ग्रुपवर जागरूक नागरिकाने त्या मुलीचे छायाचित्र टाकले. ग्रुपमधील एका सदस्यांच्या माध्यमातून या मुलीचा शोध घेत तिचे पालक घेत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक (गुन्हे) जितेंद्र सपकाळ, पोलीस कर्मचारी राजेंद्र सोळसे यांच्यासह इतर पोलीस कर्मचार्‍यांनी त्या मुलीस तिच्या आईला पोलीस ठाण्यात आले. या ठिकाणी पोलिसांनी मुलीला तिच्या आईच्या ताब्यात दिले. मुलगी सुखरूप मिळाल्याने आईच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. त्यांनी पोलिसांचे आभार मानले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -