घरताज्या घडामोडीमहागाईविरोधात निदर्शने करणाऱ्या काँग्रेसच्या ४ खासदारांचे संपूर्ण अधिवेशनासाठी निलंबन

महागाईविरोधात निदर्शने करणाऱ्या काँग्रेसच्या ४ खासदारांचे संपूर्ण अधिवेशनासाठी निलंबन

Subscribe

महागाईविरोधात लोकसभेत फलक घेऊन निदर्शने करणाऱ्या काँग्रेसच्या चार खासदारांना सभागृहातून निलंबित करण्यात आले आहे. काँग्रेस खासदार मणिकम टागोर, ज्योतिमणी, रम्या हरिदास आणि टीएन प्रतापन यांना संपूर्ण अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आले आहे.

महागाईविरोधात लोकसभेत फलक घेऊन निदर्शने करणाऱ्या काँग्रेसच्या चार खासदारांना सभागृहातून निलंबित करण्यात आले आहे. काँग्रेस खासदार मणिकम टागोर, ज्योतिमणी, रम्या हरिदास आणि टीएन प्रतापन यांना संपूर्ण अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आले आहे. जीवनाश्यक वस्तूंच्या किमतीत दिवसेंदिवस वाढ होत असल्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागत आहे. या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसच्या खासदारांनी निदर्शने दिली. त्यामुळे त्यांना निलंबीत करण्यात आले असून, लोकसभेचे कामकाज मंगळवार २६ जुलै रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले आहे. (suspension of four congress mp for the entire session was pointing out in the lok sabha)

सभापतींच्या खुर्चीत बसलेल्या राजेंद्र अग्रवाल यांनी गोंधळ घालत असलेल्या काँग्रेसच्या चार खासदारांची नावे घेतली. यानंतर नियम ३७४ अन्वये काँग्रेसच्या चार खासदारांना अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी निलंबित करण्यात आले आहे. त्यानंतर त्यांनी सभागृहाचे कामकाज तहकूब केले.

- Advertisement -

या निलंबनाच्या कारवाईप्रकरणी विरोधी पक्षातील खासदारांनी सभागृहात घोषणाबाजी आणि फलक दाखवून महागाई, स्वयंपाकाच्या गॅसच्या किंमतीत झालेली वाढ या मुद्द्यांवर केंद्राशी चर्चा करण्याची मागणी केली. त्यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी त्यांना फटकारले आणि सभागृहाची प्रतिष्ठा राखण्यास सांगितले.

“हे लोकशाहीचे मंदिर आहे. सभागृहाची प्रतिष्ठा राखणे ही सदस्यांची जबाबदारी आहे. सरकार चर्चेसाठी तयार आहे. तुम्हाला चर्चा करायची असेल मी तयार आहे. पण तुम्हाला सभागृहात फक्त फलक दाखवायचे असतील तर तुम्ही दुपारी ३ नंतर सभागृहाबाहेर हे करू शकता. सभागृह चालायला हवे असे देशातील जनतेला वाटते. तसेच, सभागृहात फलक घेऊन आलेल्या कोणत्याही खासदाराला कामकाजात भाग घेऊ दिला जाणार नाही”, असे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी निदर्शन करणाऱ्या खासदारांना म्हटले.

- Advertisement -

हेही वाचा – बहुमत आहे तर मंत्रिमंडळाचा विस्तार का रखडला? अजित पवारांचा सवाल

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -