घरमहाराष्ट्रविखेंच्या संकटात तेरावा महिना गांधी समर्थक उमेदवार देणार

विखेंच्या संकटात तेरावा महिना गांधी समर्थक उमेदवार देणार

Subscribe

भाजपची अखंड रेवडी उडवणार्‍यांच्या पुत्राला उमेदवारी देऊन सख्खे आणि परक्यांचा फरक भाजप नेत्यांनी अधिक दृढ केल्याचा आक्षेप घेत अहमदनगरमध्ये राधाकृष्ण विखेपाटील यांचे पुत्र सुजय यांना कुठल्याही परिस्थितीत मतदान करायचे नाही, असा फतवाच विद्यमान भाजप आमदार दिलीप गांधी आणि त्यांच्या ज्येष्ठ सहकार्‍यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला आहे. सुजयच्या विरोधात दिलीप गांधी यांचे पुत्र सुवेंद्र यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णयही रविवारी पार पडलेल्या गांधी समर्थक भाजप नेत्यांच्या बैठकीत घेण्यात आला यामुळे विखेपाटील यांचा पाय अधिकच खोलात गेला आहे.

स्थानिक कार्यकर्त्यांचा विरोध डावलून भाजप नेत्यांनी विशेषत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांमध्ये फूट पाडण्याच्या हेतूने राधाकृष्ण विखेपाटील यांचे पुत्र सुजय यांना पक्ष प्रवेश देत थेट अहमदनगरच्या खासदारकीची उमेदवारी बहाल केली. पक्ष नेत्यांच्या या निर्णयाला अहमदनगरच्या भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार विरोध दर्शवला आहे. रविवारी स्थानिक भाजप नेत्यांच्या बैठकीत हा विरोध उघडपणे करण्याचा निर्णय घेत सुजयविरोधात उमेदवार देण्याची घोषणा करण्यात आली. विद्यमान खासदार दिलीप गांधी यांचे पुत्र सुवेंद्र यांची उमेदवारी दाखल केली जाणार आहे. आता माघार नाही, असं सांगत उपस्थितांनी नेत्यांनाही हे कधीतरी दाखवण्याची गरज असल्याचे ऐकवण्यात आले.

- Advertisement -

सुजय विखे यांच्या उमेदवारीविरोधात गांधी समर्थकांनी एकदम टोकाची भूमिका घेतली आहे. दिलीप गांधी यांच्याविरोधात कुठलीही तक्रार नाही. उलट त्यांचे खासदार म्हणून काम उजवे असताना त्यांना दूर करून काल पक्षात आलेल्यांना उमेदवारी देऊन नेत्यांनी पक्षात होयबांना अधिक महत्व असल्याचे दाखवून दिल्याचा आरोप गांधी यांनी केला. यामुळे आता सुजय यांना कुठल्याही परिस्थिती मतदान करायचे नाही, असा ठाम निर्धार करण्यात आला आहे. याच बैठकीत एका कार्यकर्त्याने शक्य असल्यास राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी घ्या, असेही ऐकवत यांना धडा शिकवा, असे म्हटले. मात्र त्या पक्षाचा उमेदवार निश्चित झाल्याने आता उशिर झाल्याचेही काहींनी सांगितले. दिलीप गांधींच्या समर्थकांच्या या आक्रमक भूमिकेमुळे सुजय विखे यांची चांगलीच अडचण झाली आहे. कार्यकर्त्यांच्या या पवित्र्याला काहीही समजा, हवेतर त्याला बंडखोरी म्हणा. पण आता थांबायचे नाही, असा निर्धार व्यक्त करण्यात आला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -