घरमहाराष्ट्रपुणेNitin Gadkari : पुणेकरांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका; हवेतून चालणार बस

Nitin Gadkari : पुणेकरांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका; हवेतून चालणार बस

Subscribe

पुण्यातील चांदणी चौकातील नव्या उड्डाणपुलाचे आज केंद्रीय वाहतूक आणि रस्ते मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण झाले.

पुणे : विविध गोष्टींनी ओळखल्या जाणाऱ्या पुण्यातील वाहतूक कोंडीही पुण्याची एक ओळख आहे. मात्र, आता पुढील काही दिवसांत पुणेकारांना या वाहतूक कोंडीतून सुटका मिळणार आहे. कारण, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी पुण्यातूनही आता हेवतून चालणाऱ्या बसेस ही योजना आणणार असल्याची घोषणा केली असून, ही घोषणा मूर्तरुपात कधी येते याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.

पुण्यातील चांदणी चौकातील नव्या उड्डाणपुलाचे आज केंद्रीय वाहतूक आणि रस्ते मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण झाले. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, (Devendra fadnvis) अजित पवार, (Ajit Pawar) पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आणि भाजपचे इतर नेते उपस्थित होते. पुण्याची वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी हवेतून चालणाऱ्या गाड्यांची योजना आणणार असल्याचे आश्वासन गडकरी यांनी यावेळी बोलताना दिले.

- Advertisement -

काय म्हणाले गडकरी?

उड्डाण पुलाच्या उदघाटनप्रसंगी गडकरी म्हणाले की, सध्या पुण्यात वाहतूक कोंडीची मोठी समस्या आहे. चांदणी चौकातील कामासाठीसुद्धा वाहतूक कोंडीमुळे बरेच अडथळे आले, तर ही समस्या कायमची सोडण्यासाठी नवी योजना आणणार आहोत. हवेतून चालणाऱ्या बस आपण येथे आणणार असून, या स्काय वॉक बसमधून एका वेळेस 25 प्रवासी प्रवास करू शकणार आहेत.

गडकरींनी दिला पुणेकरांना सल्ला

यावेळी भाषणात बोलताना नितीन गडकरी म्हणाले की, पुण्यात वाहनांची संख्या वाढली असल्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण झाला आहे. आता पुण्यात वाहनांची संख्या वाढवू नका. कारण इथे खूप प्रदूषण झाले आहे, आपल्याला पेट्रोल डिझेलला देशातून हद्दपार करायचे आहे. त्यामुळे 40 टक्के प्रदूषण कमी होईल असे गडकरी म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा : कोल्ड वॉर… खुर्चीवर डोळा… अजित पवार स्पष्टच बोलले; आम्ही बेअक्कल आहोत का?

सायरनचा कर्णकर्कश आवाज गेला पाहीजे

यावेळी बोलताना नितीन गडकरी म्हणाले की, सध्याचे व्हीआयपी कल्चर गेले पाहीजे, सायरनचा कर्कश आवाज गेला पाहिजे, एकंदरीत पुण्यातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी अनेक योजना आहेत. त्यापैकी रिंग रोडही लवकरच पूर्ण होईल, मेट्रोचे कामही आता शेवटच्या टप्प्यात आहे, तर आपण स्कायवॉक बसची योजना आणणार असल्याचे नितीन गडकरी म्हणाले आहेत.

हेही वाचा : पुणे हे बुद्धिवंतांचे शहर असल्याने निर्णय घेताना अडथळे – देवेंद्र फडणवीस

मेधा कुलकर्णी, आणि दादांनी केला होता पाठपुरावा

चांदणी चौकातील उड्डाणपुलाच्या उदघाटनाच्या कार्यक्रमात भाजपच्या मेधा कुलकर्णी यांचे कार्यक्रम पत्रिकेत नाव नसल्याने त्या नाराज असल्याच्या चर्चा होत्या. यासंदर्भात त्यांनी पोस्टही लिहली होती. मात्र, गडकरी यांनी त्यांच्या भाषणात मेधा कुलकर्णी आणि चंद्रकांत पाटील या दोघांनीही आपल्याकडे मागणी करुन पाठपुरावा केला होता असा उल्लेख करीत नाराज असलेल्या मेधा कुलकर्णी यांची नाराजगी दुर करण्याचा प्रयत्न केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -