घरमहाराष्ट्रMilind Deora : दक्षिण मुंबईवर शिवसेनेने दावा केला तर काँग्रेस..., मिलिंद देवरांचा...

Milind Deora : दक्षिण मुंबईवर शिवसेनेने दावा केला तर काँग्रेस…, मिलिंद देवरांचा ठाकरे गटातील नेत्यांना इशारा

Subscribe

मुंबई :लोकसभा निवडणुकीची महाराष्ट्रासह देशात चर्चा होतेय. ही सार्वत्रिक निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आहे. अशातच काँग्रेस नेते मिलिंद देवरांनी या ठाकरे गटातील नेत्यांना इशारा दिला आहे. महाविकास आघाडीसाठी लोकसभा निवडणूक सोपी होणार नाही. कुणाही सार्वजनिक वक्तव्यं किंवा दावे करू नये असा इशारा देवरांनी दिला आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना देवरा म्हणाले की, जर शिवसेना ठाकरे गटाने दावा केला तर काँग्रेसही दावा करून उमेदवार निश्चित करेल, असं काँग्रेस नेते मिलिंद देवरा म्हणाले.

माझे मतदार कार्यकर्ते समर्थक मला फोन करत आहेत. महाविकास आघाडीतील एक घटक पक्ष दक्षिण मुंबईच्या जागेसाठी दावा करत आहे. तुमची चिंता वाढणे साहजिक आहे. मला कोणत्याही प्रकारे वाद वाढवायचा नाही किंवा करायचा नाही आहे. त्यांच्या एका प्रवक्त्याने मागील आठवड्यात काँग्रेस पक्षाला शून्यापासून सुरूवात करायला सांगितली.

- Advertisement -

हेही वाचा… Raj Thackeray : जातीपातीत महाराष्ट्राला अडकविण्याचा डाव; राज ठाकरेंचा निशाणा कोणावर?

गिरगावच्या सभेत पुन्हा एकदा दक्षिण मुंबई लोकसभा जागेसाठी त्या घटक पक्षाकडून दावा करण्यात आला. मागील 50 वर्षापासून दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसकडे आहे. देवरा परिवार हा मतदारसंघ लढवत आला आहे. खासदार असो ना नसो लोकांची कामे दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात केली आहेत. कुठल्याही लाटेत आम्ही निवडून आलेलो नाही. काम आणि नात्यांनी आम्ही हा लोकसभा मतदारसंघ आतापर्यंत जिंकला आहे. असं देवरा म्हणाले.

- Advertisement -

महाविकास आघाडीसाठी लोकसभा निवडणूक सोपी होणार नाही. त्यामुळे कोणीही सार्वजनिक दावे करू नयेत. एखादा पक्ष औपचारिक चर्चेआधी जर अशा प्रकारे दावे करत असेल तर काँग्रेससुद्धा जागांवर दावा करू शकते. त्याच प्रमाणे उमेदवार देऊ शकते. मला वाटतं हा संदेश दिल्ली आणि मुंबईतील काही महत्त्वाच्या लोकांपर्यंत पोहोचेल. अस मिलिंद देवरा म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -