घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रग्रामसेवकाची किमया; गावाला बनवले विकासाचा अनोखा 'पॅटर्न'

ग्रामसेवकाची किमया; गावाला बनवले विकासाचा अनोखा ‘पॅटर्न’

Subscribe

संगमनेर : एखाद्या अधिकार्‍यास नियोजनासह ग्रामस्थांचा पाठिंबा मिळाल्यास गावाचा झपाट्याने विकास होवू शकतो. शासनाच्या विविध योजनांच्या निधीची योग्य अंमलबजावणी करून गावाचा कायपालट करण्याची हिंमत दाखवू शकतो. त्यासाठी कामाप्रति एकनिष्ठ असणारा अधिकारी वर्ग असणे आवश्यक आहे. या उक्तीप्रमाणे स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिकांच्या सहकार्याने तालुक्यातील हिवरगाव पठार येथील ग्रामसेवक विजय कारभारी आहेर यांनी अवघ्या दोन ते अडीच महिन्यांत ५० घरकुलांसह संपूर्ण गावच सीसीटीव्ही कॅमेरा कक्षेत आणले आहे. त्यामुळे हिवरगाव पठार हे गाव खर्‍या अर्थाने विकासाचा पॅटर्न बनले आहे.

हिवरगाव पठार गावची लोकसंख्या २ हजार १६७ असून, यामध्ये वाड्या-वस्त्यांचाही मोठा प्रमाणावर समावेश आहे काही आदिवासी वाड्या डोंगरांवर वसलेल्या आहेत. त्यामुळे येथील सर्वसामान्य लोकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत होते. वारंवार पाईपलाईनमध्ये बिघाड होणे, मोटार जळणे या घटनांमुळे उन्हाळ्यात नेहमीच भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत होता. मात्र विजय आहेर या तरूण ग्रामसेवकाने पदभार स्वीकारला आणि अनेक समस्या, विविध रखडलेली विकास कामे वेगाने नावारुपाला यायला लागली. कोणत्याही परिस्थितीत गावाचा चेहरामोहरा बदलायचा हा निश्चय त्यांनी मनाशी बाळगला. कामास सुरुवात केली. सुरूवातीला त्रास झाला. समाजविघातक प्रवृत्तींकडून गावातील झाडे तोडणेे, सार्वजनिक मालमत्तांना बाधा पोहचवणे अशा पद्धतीच्या घटनाही घडविण्यात आल्या. पण ग्रामसेवक यांनी सर्वांना एकत्रित करून विकासाची मुठ बांधुन कामास सुरुवात केली.

- Advertisement -

समाजविघातक कृत्ये थांबावी म्हणून ग्रामपंचायतीच्या पंधरावित्त आयोगातून दीड लाख रूपये खर्च करून ग्रामपंचायत कार्यालय, गावठाण, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गावठाण, गिर्हेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, दोन अंगणवाड्या, स्मशानभूमी ही सर्व महत्त्वाची ठिकाणे सीसीटीव्ही कॅमेर्‍याच्या कक्षेत आणली. त्यामुळे अनुचित प्रकारांना आळा बसला आहे. गावात कुठे काय घडते ते सीसीटीव्ही कॅमेर्‍यामुळे लगेच कळते, आता हिवरगाव पठार गावावर सीसीटीव्ही कॅमेर्‍याची नजर आहे. प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना या अंतर्गत दोन ते अडीच महिन्यांत जवळपास ५० घरकुलांची कामे लाभार्थ्यांकडून पूर्ण करून घेण्यात आली आहेत. त्यामुळे खर्‍या अर्थाने विजय आहेर या ग्रामसेवकाच्या किमयामुळे हिवरगाव पठार हे गाव विकासाचा पॅटर्न बनले आहे. विशेष बाब, म्हणजे ही सर्व कामे करताना ग्रामस्थ ग्रामसेवकाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले. गटविकास अधिकारी अनिल नागणे, सहायक गटविकास अधिकारी संदिप वायाळ, विस्तार अधिकारी भाग्यश्री शेळके, विस्तार अधिकारी सदानंद डोखे, सुनील माळी, राजेंद्र कासार, ग्रहनिमार्ण अभियंता भूषण काळे, सरपंच सुप्रिया मिसाळ, उपसरपंच दत्तात्रय वनवे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी बाळू दुधवडे, निलेश जोशी आदींचे सहकार्य लाभले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -