घरठाणेठाण्यात मुख्यमंत्र्यांनी दसरा मेळाव्याबाबत भाष्य करणे टाळले; शिंदेंच्या हस्ते टेंभी नाक्यावरील अंबेमातेच्या...

ठाण्यात मुख्यमंत्र्यांनी दसरा मेळाव्याबाबत भाष्य करणे टाळले; शिंदेंच्या हस्ते टेंभी नाक्यावरील अंबेमातेच्या पाटाचे पूजन

Subscribe

ठाणे – आगामी दसरा मेळावा आणि राज्यपाल नियुक्त बारा आमदारांबाबत बोलणे प्रखरपणे टाळत, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तुर्तास वेळ मारून नेली. तसेच यावेळी त्यांनी टेंभीनाक्यावरील आंबेमातेच्या पाटाचे पूजन झाल्याचे जाहीर करत आता मूर्तीला सुरुवात होईल असेही त्यांनी शनिवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

दिवंगत आनंद दिघे यांची देवी म्हणून प्रसिद्ध असलेल्या टेंभीनाक्यावरील आंबेमातेची मूर्ती घडवली जाते. त्या कळव्यातील कारखान्यात मुख्यमंत्री शिंदे यांनी शनिवारी हजेरी लावत, तेथे देवीच्या पाटाचे पूजन केले. त्यानंतर, मनोभावे पूजाअर्चा झाल्यानंतर आरतीही केली. त्यानंतर प्रसारमाध्यमांना संबोधनात, त्यांनी देशभरातून भाविकांसह विविध क्षेत्रातील मंडळी देवीच्या दर्शनाला आवर्जून उपस्थित राहत असतात. ती परंपरा अनेक वर्षांची आहे. त्याचे पावित्र्य माहीत आहे. तसेच मोठ्या जल्लोषात,भक्तिभावे,श्रद्धापूर्वक हा उत्सव सर्व ठाणेकर आयोजित करतात. दरम्यान , देवीच्या पाटाचे पूजन झाले असून आता मूर्तीला सुरू होईल असेही सांगितले.

- Advertisement -

यावेळी त्यांनी, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे मुंबई दौऱ्यावर असल्याने त्यांनी वर्षा बंगल्यावर भेट घेऊन गणरायाचे दर्शन घेतल्याचे सांगितले. याचदरम्यान त्यांना दसरा मेळाव्याबाबत प्रश्न विचारला असता, आता गणेश चतुर्थी झाली. अनंत चतुर्थी येईल, मग नवरात्रोत्सव त्यांच्यानंतर दसरा असल्याने मेळाव्याला अजून वेळ आहे. त्याचबरोबर राज्यपाल नियुक्त बारा आमदारांबाबत प्रश्न विचारल्यावर त्यांनी तुम्हाला सांगतो, असे म्हणून बोलणे प्रामुख्याने टाळले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -