घरमहाराष्ट्रविवाहितेचा छळ केल्याप्रकरणी ४ जणांविरूध्द गुन्हा

विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी ४ जणांविरूध्द गुन्हा

Subscribe

एका महिन्यानंतर सासरच्या लोकांनी केला विवाहितेचा छळ

अहमदनगर येथील बुरूडगाव येथे लग्नानंतर थोड्याच दिवसांमध्ये माहेरून ५१ तोळे सोने आणण्याची मागणी विवाहितेकडून करण्यात आली होती. अशी मागणी करत विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी सदर विवाहित महिलेने तक्रार दाखल केली. या तक्रारी नुसार कोतवाली पोलीसांनी सदर महिलेचा पती, सासू, सासरा आणि नणंद अशा चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. अॅड. अभिजित कोठारी (पती), अॅड. राजेश कोठारी (सासरा), मंगला कोठारी (सासू) आणि रेणू कोठारी (नणंद) अशी गुन्हा दाखल झालेल्या एकाच परिवारातील लोकांची नावे आहेत.

नेमके काय घडले?

अहमदनगर येथील बुरूडगाव येथे राहणाऱ्या ३० वर्षीय सरिता अभिजित कोठारी यांनी या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. सरिता आणि अभिजित यांचे प्रेमसंबंध होते. मात्र दोघांच्या लग्नाला अभिजित कोठारी यांच्या घरच्या लोकांचा विरोध होता. त्यामुळे साडेतीन महिन्यांपूर्वी दोघांनी एका मंदिरात जाऊन लग्न केले होते. लग्नानंतर सरिता या सासरी राहाण्यासाठी गेलेल्या असतांना महिनाभर व्यवस्थित नांदविण्यात आले. मात्र एका महिन्यानंतर सासरच्या लोकांनी “माहेरून ५१ तोळे सोने आणावे, तसेच तू दुसऱ्या जातीची आहेस, दिसायला चांगली नाहीस”, असे म्हणून सरिता यांचा सातत्याने छळ केला.

- Advertisement -

सरिता यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने काढून घेऊन सासरच्या लोकांनी मारहाण करून शारिरीक व मानसिक छळ करीत त्यांना घराबाहेर काढले, असे आरोप सरिता यांनी दिलेल्या फिर्यादीत केले आहेत. या प्रकरणी पोलीसांच्या दिलासा सेल ने दोनही बाजूंमध्ये समेट घडवून आणण्याचा प्रयत्न देखील केला. मात्र समेट घडून न आल्याने अखेरीस कोतवाली पोलीसांनी कोठारी परिवारातील ४ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -