घरमहाराष्ट्रअजित पवार सत्तेत सामील झाल्यानंतरचे पहिले पावसाळी अधिवेशन आजपासून

अजित पवार सत्तेत सामील झाल्यानंतरचे पहिले पावसाळी अधिवेशन आजपासून

Subscribe
महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू होणार आहे. हे पावसाळी अधिवेशन १७ जुलैपासून ते ४ ऑगस्टपर्यंत असणार आहे. या अधिवेशनापूर्वीच राज्यातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलेली आहेत. यापूर्वी अर्थसंकल्प अधिवेशनात अजित पवार हे विधानसभेचे विरोधी पक्ष नेते होते. आता अजित पवार हे शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहेत. त्यामुळे १५ दिवस सुरू राहणाऱ्या पावसाळी अधिवेशन विरोधक कोण-कोणत्या मुद्यांवरून सरकारची कोंडी करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
 विधिमंडळाच्या पूर्वसंध्येला आयोजित केलेल्या चहापान कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकला. पावसाळी अधिवेशन हे आज सकाळी ११ वाजता विधानसभेचे कामकाज सुरू होईल, तर दुपारी १२  वाजता विधानपरिषदेचे कामकाज सुरू होणार. या अधिवेशन महागाई, टॉमेटो महागाई, शेतकऱ्यांचे प्रश्न, राज्यातून गेलेले मोठे प्रकल्प आदी मुद्द्यांवर विरोधक सरकारला धारेवर धरणार की राष्ट्रवादी काँग्रेस कशी फुटलीवर विधिमंडळात चर्चा रंगणार, याकडे सर्वांचे लक्ष असेल.
अजित पवार सरकारमध्ये सामील झाल्यानंतर त्यांच्या गटातील 9 आमदारांना मंत्री पदे मिळली आहे. राष्ट्रवादी फुटीनंतर अजित पवारसोबत जवळपास 40 पेक्षा जास्त आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा त्यांच्याकडून केला आहे. पण अजित पवार यांच्यासोबत फक्त 19 आमदार केल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले आहे. आता अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री, धनंजय मुंडे यांना कृषी मंत्री आहेत. छगन भुजबळ यांना अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री, आदिती तटकरे यांना महिला बालविकास मंत्री 9 आमदारांना मंत्री पदे मिळाली आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -