घरमहाराष्ट्रविधीची प्रथम वर्षाची परीक्षा पुढे ढकलली

विधीची प्रथम वर्षाची परीक्षा पुढे ढकलली

Subscribe

21 जानेवारीऐवजी 7 फेब्रुवारीपासून होणार परीक्षा

तीन वर्षीय विधी अभ्यासक्रमाची प्रथम सत्र परीक्षा मुंबई विद्यापीठाकडून पुढे ढकलण्यात आली आहे. 21 जानेवारीला होणारी ही परीक्षा आता 7 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. मुंबई विद्यापीठाच्या संकेतस्थळावर 20 डिसेंबरला नवे वेळपत्रक जाहीर करण्यात आले आहे. विद्यापीठाच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. तीन वर्षीय विधी अभ्यासक्रमाच्या प्रवेशप्रक्रियेला विलंबामुळे कॉलेजांकडून परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती केली होती.

मुंबई विद्यापीठाकडून पदवीचे निकाल लावण्यास झालेला विलंब व गुणपत्रिकेत टक्केवारी न देता ग्रेड दिल्याने विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यात येत असलेल्या अडचणीमुळे राज्य सामायिक प्रवेश प्रक्रिया कक्षाकडून (सीईटी) तीन वर्षीय विधी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला विलंब झाला होता. 26 नोव्हेंबरपर्यंत ही प्रवेश प्रक्रिया सुरू होती. प्रवेश प्रक्रिया सुरू असतानाच नोव्हेंबरमध्ये मुंबई विद्यापीठाकडून विधी अभ्यासक्रमाच्या पहिल्या सत्राच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. यानुसार 21 जानेवारीपासून परीक्षा सुरू होणार होती.

- Advertisement -

प्रवेश झाल्यानंतर अवघ्या दीड महिन्यात परीक्षेला सामोरे जावे लागत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी विद्यार्थी व संघटनांकडून होऊ लागली होती. तसेच कमी कालावधीत अभ्यासक्रम कसा पूर्ण करणे शक्य नसल्याने परीक्षा पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी कॉलेज प्रशासनाकडून करण्यात आली होती. याची दखल घेत मुंबई विद्यापीठाने 21 जानेवारी होणारी परीक्षा 7 फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -