घरमहाराष्ट्रप्रीती राठी अॅसिड हल्ला प्रकरण; आरोपीची फाशी जन्मठेपेत बदलली

प्रीती राठी अॅसिड हल्ला प्रकरण; आरोपीची फाशी जन्मठेपेत बदलली

Subscribe

प्रीती राठी अ‍ॅसिड हल्ला प्रकरण

मुंबईत प्रीती राठी या तरुणीवर झालेल्या अ‍ॅसिडहल्ला प्रकरणात फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेला आरोपी अंकुर पनवार याची फाशीची शिक्षा हायकोर्टाने बुधवारी रद्द करून जन्मठेपेत बदलली आहे. अंकुर पनवार याला २०१६ मध्ये विशेष महिला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेला त्याने मुंबई हायकोर्टात आव्हान दिले होते.

भारतीय नौदल रुग्णालयात नर्स म्हणून सेवेत रुजू होण्यासाठी दिल्ली येथून पहिल्यांदाच मुंबईत आलेल्या २३ वर्षीय प्रीती राठी या तरुणीवर वांद्रे रेल्वे टर्मिनस येथे २ मे २०१३ रोजी अ‍ॅसिडहल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या प्रीतीला मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान १ जून २०१३ रोजी तिचा मृत्यू झाला होता. या प्रकरणाच्या तपासात अपयशी ठरलेल्या मुंबई रेल्वे पोलिसांकडून या तपासाची सूत्रे मुंबई गुन्हे शाखेकडे देण्यात आली होती.

- Advertisement -

या तपासासाठी गुन्हे शाखेचे विशेष पथक तयार करण्यात आले होते. या तपास पथकाने दिल्ली येथे तिच्याच घराशेजारी राहणार अंकुर पनवार या तरुणाला १७ जानेवारी २०१४ रोजी अटक केली. प्रीती राठी हिचे यश अंकुर पनवार याला पहावत नव्हते, त्यातून त्याने प्रीती राठीचा दिल्लीपासून पाठलाग केला. वांद्रे रेल्वे टर्मिनसच्या आवारात त्याने तिच्यावर अ‍ॅसिड हल्ला केला, असे त्याने जबाबात म्हटले होत

हा खटला मुंबईच्या सत्र न्यायालयातील विशेष महिला न्यायालयात सुरू होता. सरकारी वकील म्हणून या खटल्याचे कामकाज उज्ज्वल निकम यांनी पाहिले होते. विशेष महिला न्यायालयाने दोन्ही पक्षांच्या बाजू ऐकल्यानंतर अंकुर पनवारला दोषी ठरवून २०१६ मध्ये फाशीची शिक्षा सुनावली होती. अंकुर पनवारने २०१७ मध्ये या फाशीच्या शिक्षेला हायकोर्टात आव्हान दिले होते. हायकोर्टात हा खटला न्या. बी. पी. धर्माधिकारी आणि न्या. पी.डी नाईक यांच्या खंडपीठा समोर मागील दोन वर्षे सुरू होता. अखेर बुधवारी या खटल्यावर सुनावणी झाली. न्या. बी. पी. धर्माधिकारी आणि न्या. पी.डी नाईक यांच्या खंडपीठाने अंकुर पनवार याची फाशीची शिक्षा रद्द करून ती जन्मठेपेत बदलण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -