घरमहाराष्ट्रआठवडाभरातील सर्वाधिक कमी रुग्णसंख्येची नोंद

आठवडाभरातील सर्वाधिक कमी रुग्णसंख्येची नोंद

Subscribe

राज्यात २,८३४ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, कोरोना बाधित रुग्णांची संख्या १८,९९,३५२ झाली आहे. राज्यात ५९,४६९ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झाली. मागील आठवडाभरातील सर्वाधिक कमी रुग्णसंख्येची नोंद सोमवारी झाली. राज्यात २,८३४ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, कोरोना बाधित रुग्णांची संख्या १८,९९,३५२ झाली आहे. राज्यात ५९,४६९ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात आज ५५ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून मृतांची संख्या ४८,८०१ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.५७ टक्के एवढा आहे.

राज्यात आज ५५ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबई १२, ठाणे ४, नाशिक ९, पुणे ५, गडचिरोली ७ आणि नागपूर ५ यांचा समावेश आहे. नोंद झालेल्या ५५ मृत्यूंपैकी २९ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १० मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित १६ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे १६ मृत्यू गडचिरोली ७, पुणे ५, औरंगाबाद १, कोल्हापूर १, नागपूर १ आणि नाशिक १ असे आहेत.

- Advertisement -

आज ६,०५३ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण १७,८९,९५८ करोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.२४ टक्के एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,२१,५७,९५३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १८,९९,३५२ (१५.६२ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,०४,९३८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३,५७९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -