घरताज्या घडामोडीभेटींचं सत्र सुरुच, संजय राऊत-आशिष शेलार गुप्त भेट, प्रवीण दरेकर म्हणतात...

भेटींचं सत्र सुरुच, संजय राऊत-आशिष शेलार गुप्त भेट, प्रवीण दरेकर म्हणतात…

Subscribe

काही महत्त्वाचे कारण असेल तर कोण कोणालाही भेटू शकतो - आशिष शेलार

राज्यातील प्रमुख नेत्यांच्या भेटीगाठी सुरुच आहेत. संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती यानंतर तिथून थेट राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटासीठी सिल्व्हर ओकवर गेले होते. यानंतर शरद पवार यांनी वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली वारी करत केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. शनिवारी पुन्हा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते आशिष शेलार यांची भेट घेतली असल्यामुळे राजकीय वर्तुळात संभ्रम निर्माण झाला आहे. राजकीय मंडळी या भेटींवर तर्कवितर्क लढवले जात आहेत. यावर भाजप नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दोन नेते भेटू शकतात असे बोलून संशय वाढवला आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत हे मागील काही दिवसांपासून राज्यातील प्रमुख नेत्यांच्या भेटी-गाठी घेत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार, दिल्लीवारी केल्याचेही समजते आहे यानंतर आता भाजप नेते आशिष शेलार यांची भेट घेतली आहे. राऊत आणि आशिष शेलार यांची मुंबई नरिमन पाँईट्स येथील मेकर चेंबर्समध्ये भेट झाली आहे. याबाबतचा व्हिडिओही एका खासगी वृत्तवाहिनीने दाखवले आहे. यावर सर्व प्रकरणावर भाजप नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

- Advertisement -

प्रवीण दरेकरांनी संभ्रम वाढवला

भाजपन नेते प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे की, दोन नेते एकमेकांना भेटू शकतात अशी प्रतिक्रिया प्रवीण दरेकर यानी दिली असल्यामुळे शंका वाढत चालल्या आहेत. भाजप कोणालाही ब्लॅकमेल करत नाही आहे. सक्षम विरोधी पक्ष म्हणून भाजप काम करत आहे. शिवसेनेकडून सत्तेसाठी हात पुढे केला तर आम्ही विरोधातच लढणार असल्याचे दरेकर यांनी म्हटलं आहे.

चंद्रकांत पाटील प्रतिक्रिया

राज्यातील राजकारणात अशा भेटी होत असतात. शेलार आणि राऊत चांगले मित्र आहेत. ते त्यांचं काम करत आहेत आम्ही आमच काम करणार, शिवसेनेकडून हात पुढे करण्याचे काही कारण दिसत नाही तशी शक्यताही दिसत नाही अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

- Advertisement -

शेलारांकडून भेटीचं खंडन

काही महत्त्वाचे कारण असेल तर कोण कोणालाही भेटू शकतो. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यासोबत भेट झाली असती तर लपवण्याच कारण येत नाही अशी प्रतिक्रिया भाजप आमदार आशिष शेलार यांनी दिली आहे.

नाना पटोले यांची प्रतिक्रिया

महाराष्ट्र असं एक राज्य आहे जिथे निवडणूकीपुरते मतभेद असतात परंतु निवडणूक झाल्यावर सगळे मित्र असतात. संजय राऊत आणि आशिष शेलार मुंबईतच असतात. काही कारणास्तव मिळाले असतील एकमेकांना त्याचा राजकारणाशी संबंध लावण्याचं काही कारण नाही. महाविकास आघाडी वाचवण्याचा प्रश्न येत नाही कारण हे सरकार ५ वर्ष टिकणार असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -