घरमहाराष्ट्रधोरण विचारपूर्वक असायला हवे

धोरण विचारपूर्वक असायला हवे

Subscribe

जनतेने आपले अमूल्य मत देऊन सरकारला निवडून आणले आहे. त्यामुळे त्यांच्या अपेक्षा वाढणे हे सहाजिकच आहे. अभिनेत्री म्हणून माझा अनेक वर्षांचा प्रवास राहिलेला आहे. शिवाय संस्कृती कला दर्पणच्या निमित्ताने कला माध्यमाशी माझा आणखीन जवळचा संबंध आलेला आहे. कलाकार, निर्माते यांच्यामध्ये प्रचंड निराशा आहे हे मला अधिक जाणवते. प्रत्येक वर्षी चित्रपटांची संख्या ही वाढते आहे.

असे असताना त्यांना थिएटर उपलब्ध करुन देण्यात सरकारला काय अडचण येत आहे हे अद्याप मला कळत नाही. प्रेक्षकांनी आवर्जून चित्रपट पाहावेत, असे साठ-सत्तर चित्रपट हमखास येत असतात. मराठी निर्मात्यांनी आवाज उठवला म्हणून त्यांना चित्रपटगृहे उपलब्ध करुन देतात. पण ती वेळ मराठी प्रेक्षकांना उपयोगी नसते. मराठी चित्रपटांना प्राईम टाईम मिळावा, चित्रपटांचा दर्जा वाढावा यासाठी ज्या सवलती दिल्या जातात, त्या प्रथम बंद करा. त्याविषयीचे योग्य धोरण अंमलात आणा. कलेच्याबाबतीत जशी ही गत पहायला मिळते तसे सामान्य माणसे आणि उद्योगी माणसे यांच्यातसुद्धा संतापच पहायला मिळतो.

- Advertisement -

उद्योगांच्या बाबतीत ठोस असे धोरण न आखले गेल्यामुळे अनेक उद्योग बंद पडलेले आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे अनेक कामगार बेघर झालेले आहेत. मतदारांनी आपला अधिकार बजावायलाच हवा, परंतु ज्या अडचणींना तोंड द्यावे लागते आहे तिथे खंबीरपणे उभेही राहिले पाहिजे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -