घरमहाराष्ट्रबांधकाम विभागाची झोप उडता उडेना!

बांधकाम विभागाची झोप उडता उडेना!

Subscribe

नेरळ ते खांडा रस्ता खड्डेमय, ग्रामस्थाने केली पदरमोड

नेरळ ते खांडा रस्त्याच्या दुर्दशेबाबत रायगड जिल्हा परिषदेचा बांधकाम विभाग निद्रावस्थेत असल्याने अखेर येथील ग्रामस्थ सुभाष नाईक यांनी स्वखर्चाने रस्त्यावरील खड्डे भरले आहेत. यामुळे त्यांचे कौतुक होत आहे, तर दुसरीकडे बांधकाम विभागाच्या आंधळ्या कारभाराविषयी संताप व्यक्त होत आहे.

एमएमआरडीए (मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण) ने २२.५० कोटी इतका निधी नेरळला दिल्याने शहरातील रस्त्यांच्या कामांना सुरूवात झाली. झपाट्याने वाढणार्‍या या शहरातील रस्ते सुसज्ज व उत्कृष्ट व्हावेत हा त्यामागील उद्देश होता. हा निधी एमएमआरडीएने जिल्हा परिषदकडे वर्ग केला. रस्त्याच्या कामांना सुरूवात झाल्यानंतर रस्ते चकाचक होणार या आशेने नागरिक सुखावले. मात्र काही दिवसातच त्यांच्या पदरी निराशा पडली. एकूण आठ कामांपैकी एक काम होते नेरळ रेल्वे स्टेशन ते खांडा. या कामाला उशिराने का होईना सुरवात झाली. रेंगाळत काम पुढे ढकलले जात असताना रस्ता अर्धवट करून ठेकेदाराने दुसर्‍या कामाला सुरूवात केली. उर्वरित रस्ता आज होईल उद्या होईल, या आशेवर नागरिक होते. पण पुढील रस्ता या कामात समाविष्ट नाही. चिंचेच्या झाडापर्यंतच हा रस्ता मंजूर आहे, असे आमसभेत बांधकाम विभागाच्या उप अभियंत्यांनी सांगितले.

- Advertisement -

मोठ्या प्रमाणात वाहतूक असलेल्या या रस्त्यावर चालणेही मुश्किल झाले आहे. खड्डे चुकविण्याच्या नादात अनेक वेळा वाहनांचा धक्का पादचार्‍यांना लागणे हे नित्याचेच झाले आहे. रस्त्याच्या दुरुस्तीसाठी पाठपुरावा करण्यात आला. बांधकाम विभागाने या रस्त्यावरील साधे खड्डे बुजवण्याची तसदी घेतली नाही. त्यामुळे व्यथित होऊन नाईक यांनी स्वतःकडील १ हजार विटा वापरून रस्त्यावरील खड्डे बुजवले आहेत. स्वतःच्या संपूर्ण कुटुंबासह त्यांनी खांडा रस्त्यावरील पडलेले सगळे खड्डे बुजवले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -