घरमहाराष्ट्रएका नेत्याबाबतचा अंदाज योग्य होता, पण दुसऱ्याविषयी ऐकून आश्चर्यच वाटले - रोहित...

एका नेत्याबाबतचा अंदाज योग्य होता, पण दुसऱ्याविषयी ऐकून आश्चर्यच वाटले – रोहित पवार

Subscribe

मुंबई : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण विभागाने बारामती येथील Baramati Agro या प्लान्टवर कारवाई केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसेचे आमदार रोहित पवार यांनी ‘दोन नेत्यां’वर निशाणा साधत, मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचा आरोप केला होता. आता पुन्हा एकदा त्यांनी ट्वीट करत, एका नेत्याबाबतचा अंदाज योग्य होता, पण दुसऱ्याविषयी ऐकून आश्चर्यच वाटल्याचे म्हटले आहे.

हेही वाचा – सत्ताधाऱ्यांना झोप तरी कशी लागते? रुग्णमृत्यूवरून जयंत पाटील यांचा संतप्त सवाल

- Advertisement -

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण विभागाने 28 सप्टेंबर 2023 रोजी पहाटे दोनच्या सुमारास आमदार रोहित पवार यांच्या Baramati Agro या प्लान्टला नोटीस दिली. 72 तासांत हा प्लांट बंद करण्याचे निर्देश या विभागाने दिले होते. मुंबई उच्च न्यायालयाने प्रदूषण नियंत्रण मंडळाला 6 ऑक्टोबरपर्यंत Baramati Agro कंपनीवर कारवाई न करण्याचे आदेश दिले आहेत. आता या प्रकरणी पुढील सुनावणी 6 ऑक्टोबरला होणार आहे.

- Advertisement -

तत्पू्र्वी, नोटीस मिळाल्यानंतर रोहित पवार यांनी ट्विटरवरून प्रतिक्रिया दिली होती. राज्यातील दोन मोठ्या नेत्यांच्या सांगण्यावरून कुठला तरी द्वेष मनात ठेवून आज, गुरुवारी पहाटे दोन वाजता राज्य शासनाच्या एका शासकीय विभागाच्या माध्यमातून माझ्या कंपनीच्या एका विभागावर कारवाई करण्यात आली, असे सांगतानाच, सर्वसामान्यांच्या कामाबाबत सुस्ती दाखवणारी यंत्रणा या दोन नेत्यांच्या इच्छेसाठी माझ्यावर कारवाई करताना खूप तत्परता दाखवते, याचा मात्र नक्कीच आनंद आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा – रुग्णांच्या मृत्यूवरून संजय राऊतांची सरकारवर सडकून टीका, म्हणाले – “यांचा काय सत्कार करायचा का?”

पण आज, बुधवारी त्यांनी पुन्हा एकदा ट्वीट करत, या दोन नेत्यांचा उल्लेख केला आहे. माझ्या कारखान्यावरील कारवाईबाबत शिंदे गटातील एका नेत्याने दिलेली माहिती इंटरेस्टींग आहे. या कारवाईमागे राज्यातील एका नेत्याबाबतचा अंदाज योग्य होता, पण दुसऱ्या नेत्याविषयी ऐकून जरा आश्चर्यच वाटले, असे त्यांनी सांगितले.

केवळ राजकीय द्वेष या एकमेव कारणामुळे माझ्या कारखान्यावर कारवाई करण्याचा प्रयत्न झाला नाही तर, याव्यतिरिक्तही अनेक कारणे आहेत. त्यामुळे भविष्यात ही केस लढायला शासनाकडून बड्या वकीलांची फौज उभी केली जाईल, जी सामान्य लोकांची बाजू मांडण्यासाठी कधीही उभी केली जात नाही. पण तरीही मी डगमगणार नाही. कितीही त्रास देण्याचा प्रयत्न केला तरी पूर्ण ताकदीनिशी लढेन. कुणापुढे झुकणार नाही, कारण माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे, असे त्यांनी पुन्हा एकदा म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -