घरमनोरंजनअभिनेत्री मयूरी वाघ 'एकवीरा देवीच्या' भूमिकेत

अभिनेत्री मयूरी वाघ ‘एकवीरा देवीच्या’ भूमिकेत

Subscribe

यावेळी मयुरी वाघ एका आगळ्या वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे.

मराठी मालिका विश्वातील अभिनेत्री मयुरी वाघ हीने नेहमीच विविध भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. दरम्यान मयुरी वाघ ही पुन्हा एकदा छोट्या पडद्यावरून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यावेळी मयुरी वाघ (mayuri wagh) एका आगळ्या वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. मयुरी वाघ एकविरा देवीच्या (ekvira devi) भूमिकेत दिसणार आहे.

नेहमी भक्तांच्या पाठीशी असणारी देवी एकवीरा, भक्तांना त्यांचा संकटातून कशी तारून नेते, हे पाहणे उत्सुकतेचे असेल. ‘आशीर्वाद तुझा एकवीरा आई’ (ashirwad tujha ekvira aai)या नव्या मालिकेतून एकविरा देवीच्या भूमिकेत मयुरी वाघ दिसणारा आहे. सोनी मराठीवर ही मलिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. दरम्यान या मालिकेचा पहिला प्रोमो प्रेक्षकांचा भेटीला आला असून त्यात एकवीरा आईच्या भूमिकेतील मयूरी वाघ प्रेक्षकांना पाहायला दिसणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mayuri Wagh (@mayurri.wagh_official)

- Advertisement -

छोट्या पडद्यावर अनेक विविध विषयांच्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. त्यामध्ये आता अजून एका मालिकेची भर पडणार आहे. मयूरी वाघ आई एकवीराची भूमिका कशी साकारते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. मयूरी वाढ व्यतिरिक्त या मालिकेत अमृता पवारही छोट्या पडद्यावर पुन्हा दिसणार आहे. प्रेक्षकसुद्धा ही मालिका पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

- Advertisement -

हे ही वाचा – चिन्मय मांडलेकर फ्रेश भूमिकेत, ‘सनी’मध्ये साकारली कार्यसम्राट आमदाराची व्यक्तिरेखा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -