घरमहाराष्ट्रकेंद्र सरकारने नियम बदलल्यानंतर १५५९ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला

केंद्र सरकारने नियम बदलल्यानंतर १५५९ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला

Subscribe

करोना रुग्णांना डिस्चार्जच्या बदललेल्या नियमांनंतर बरे होणार्‍या रुग्णांचा आकडा वाढला आहे. सोमवारी १५५९ करोना रुग्णांना बरे झाल्यामुळे डिस्चार्ज देण्यात आला. मात्र त्यासोबतच नव्या करोना बाधितांचा आकडाही कमालीचा वाढला आहे. सोमवारी देशभरात ४२१३ नवे रुग्ण सापडले असल्याचे आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अगरवाल यांनी सांगितले.

सोमवारी दिवसभरात १५५९ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. यामुळे रिकव्हरी रेट ३१.१५ टक्क्यांवर गेला आहे. देशातील एकूण रुग्णांचा आकडा ६७१५२ वर गेला असल्याचे अगरवाल म्हणाले. देशातील एकूण २०९१७ रुग्ण बरे झाले असून आता ४४०२९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जगभरातील ७ देशांनी तेथील डिस्चार्ज पॉलिसी बदलली आहे. चाचणी ऐवजी आता लक्षणे आणि वेळ यावर लक्ष केंद्रीत केले आहे. यामुळे भारतानेही यामध्ये बदल केले आहेत, असेही अगरवाल म्हणाले.

- Advertisement -

होम क्वारंटाईन संदर्भात सोमवारी (11 मे) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नवीन मार्गदर्शक सूचना (गाईडलाईन्स) जारी केल्या आहेत. होम क्वारंटाईनसंबंधित आरोग्य मंत्रालयाकडून नियमात मोठा बदल करण्यात आला आहे. यामध्ये करोनाची सौम्य लक्षणे आढळल्यानंतर घरातच क्वारंटाईन ठेवण्यात आलेले लोक हे होम क्वारंटाईनमधून केव्हा बाहेर येऊ शकतात हे स्पष्ट करण्यात आले आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या नव्या मार्गदर्शक सूचनेनुसार ज्या रुग्णांना करोनाची सौम्य लक्षणे आहेत असे रुग्ण लक्षणे दिसल्यापासून 17 दिवसांनंतर होम क्वारंटाईन बाहेर येऊ शकतात अथवा ते संपवू शकतात. मात्र या 17 दिवसांच्या काळात सलग 10 दिवस अशा रुग्णाला ताप आलेला नसावा. तसेच सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना 17 दिवसांनंतर करोना चाचणी करण्याची आवश्यकता नसल्याचे देखील यामध्ये म्हटले आहे.

- Advertisement -

काय होते नियम?
करोनाची लक्षणे असलेला रुग्ण हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यावर त्याच्या दोन करोना चाचण्या केल्या जायच्या. रुग्णाची पहिली चाचणी जरी निगेटिव्ह आली तरीही सात दिवसांनंतर त्याच्यावर दुसरी करोना चाचणी करण्यात यायची. त्यामुळे तो रुग्ण कमीतकमी चौदा दिवस हॉस्पिटलमध्ये राहायचा. आता मात्र पहिली चाचणी निगेटिव्ह आली तर दुसरी चाचणी करण्यात येत नाही. त्याला घरी सोडून होम क्वारंटाईन केले जाते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -