घरमहाराष्ट्रसमृद्धी महामार्गासाठीचा पैसा राज्य सरकारच उभारणार

समृद्धी महामार्गासाठीचा पैसा राज्य सरकारच उभारणार

Subscribe

समृद्धी महामार्गासाठी लागणारा पैसा आता राज्य सरकारच उभारणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिली. तसेच महामार्गाचे काम लवकरात लवकर सुरू होणार असून मंत्रिमंडळाच्या बैठकीतच समृद्धी महामार्गाला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे,असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता ही तो प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्याची जबाबदारी आमची असल्याचेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

विरोधकांकडून ठाकरे सरकारवर ‘स्थिगिती सरकार’अशी टीका होत होती.या आरोपांना उत्तर देताना आम्ही कोणत्याही प्रकारच्या कामाला स्थगिती दिली नाही. केवळ आम्ही कामांचा आढावा घेत आहोत.समृद्धी महामार्गासाठी राज्य शासन कर्जाच्या माध्यमातून पैसे उभारणार होते. त्या कर्जाच्या व्याजापोटी सरकारला पैसे द्यावे लागणार होते. परंतु, आता महामार्गासाठी राज्य सरकारच पैसा उभारणार असून यामुळे व्याजापोटी जाणारे अडीच हजार कोटी रूपये वाचणार असल्याची माहितीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. हा प्रकल्प महाराष्ट्राला अभिमान वाटेल असा असेल.

- Advertisement -

तसेच समृद्धी महामार्गालगतच्या व्यवसायांमधून रोजगार निर्मिती करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.तसेच कोणत्याही सिंचन प्रकल्पाला आपण स्थिगिती देण्यात आलेली नाही. सिंचन प्रकल्प पूर्णत्वास नेताना कालव्यांचीही दुरूस्ती करण्यात येणार आहेत. तसेच गोसेखुर्द प्रकल्पासाठी लागेल तेवढा पैसाही राज्य सरकार देईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले. तसेच धान उत्पादक शेतकर्‍यांसाठी २०० रूपये अधिक देण्यात येतील. तसेच पूर्ण विदर्भात स्टील प्रकल्प उभारण्यात येतील, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. तसेच यावेळी त्यांनी यवतमाळ जिल्ह्यासाठी विशेष निधीची घोषणाही केली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील मदत करण्याची विनंती केली.

…महाराष्ट्राला मदत का नाही?

- Advertisement -

मोदी मंगोलियाला चार लाख कोटी डॉलर देतात मग महाराष्ट्राला का देत नाहीत?, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारतीय जनता पक्षाचे नाही तर देशाचे पंतप्रधान आहेत. नरेंद्र मोदी हे जागतिक दर्जाचे नेते आहेत, असे मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -