घरमहाराष्ट्रपोलिसांच्या तपासणीत आढळून आले सत्य

पोलिसांच्या तपासणीत आढळून आले सत्य

Subscribe

३५० सोसायटीमधील १४८ सुरक्षा रक्षक गाढ झोपे

पिंपरी-चिंचवड शहरातील वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत ३५० सोसायट्यांमधील १४८ सुरक्षा रक्षक रात्री गाढ झोपते असल्याचे पोलिसांनी निदर्शनास आणून दिले आहे. त्यामुळे सोसायटीमधील रहिवासी सुरक्षित आहेत का असा प्रश्न निर्माण होत आहे.रात्र झाल्यानंतर खर्‍या अर्थाने सुरक्षा रक्षकांचे कर्तव्य सुरू होते; परंतु अनेक सुरक्षा रक्षक रात्रीच्यावेळी गाढ झोपत असल्याचे वाकड पोलिसांनी निदर्शनास आणून दिले आहे.

सप्टेंबर महिन्यात भरदिवसा वाकड पोलिसांच्या हद्दीतील सोसायटी आणि बंद फ्लॅटमध्ये रेकी करून अवघ्या दहा मिनिटांत सोने, चांदीचे दागिने चोरी करून एक सराईत गुन्हेगार पसार झाला होता.त्याला शोधण्यासाठी वाकड पोलिसांना सोशल मीडियाचा आधार घ्यावा लागला होता.या घटनेनंतर पोलिसांनी गांभीर्याने घेत गस्त वाढवली होती. मंगळवारी रात्री उशीरा वाकड पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हरीश माने यांच्या टीमने वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाकड,काळेवाडी,राहटणी अशा ठिकाणच्या तब्बल ३५० सोसायट्या पिंजून काढल्या. त्यात त्यांना, ३५० सोसायट्यांपैकी १४८ सोसायट्यांमधील सुरक्षा रक्षक हे गाढ झोपेत असल्याचे आढळले.

- Advertisement -

वाकड पोलिसांनी याची दखल घेऊन संबंधित सोसायटीच्या अध्यक्षांना ही बाब निदर्शनास आणून दिली आहे. कामचुकारपणा करणारे सुरक्षा रक्षक झोपलेले आढळल्याने त्यांच्यावर कडक कारवाई, करा असे पोलीस अधिकार्‍यांनी सांगितले आहे. पिंपरी-चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणावर व्यवसाय आणि नोकरी करण्यासाठी परराज्यातून आणि महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून लोक आलेली आहेत. ते सुट्टीवर आपल्या गावी गेल्यानंतर चोरांना त्यांच्या घरावर डल्ला मारण्याची संधी मिळते.याकाळात मोठ्या प्रमाणावर चोरीच्या घटना घडतात. त्याचमुळे वाकड पोलिसांनी सोसायटीमधील सुरक्षा रक्षकांची चाचपणी केल्याची माहिती वरीष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने यांनी दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -