घरमहाराष्ट्र...तर गोपीनाथ मुंडेंना अपेक्षित राजकारण मी करू शकणार नाही; पंकजा मुंडे स्पष्टच...

…तर गोपीनाथ मुंडेंना अपेक्षित राजकारण मी करू शकणार नाही; पंकजा मुंडे स्पष्टच बोलल्या

Subscribe

बीड : स्व. गोपीनाथ मुंडे यांचा आज नववा स्मृतिदिन आहे. यानिमित्त दरवर्षीप्रमाणे बीडमधील परळीच्या गोपीनाथ गडावर  (Gopinath Gad) आध्यात्मिक आणि सामाजिक कार्यक्रम होत असतो. यावर्षी होत असलेल्या कार्यक्रमात बोलताना पंकजा मुंडे यांनी स्पष्ट वक्तव्य केले आहे. त्या म्हणाल्या की, माझ्या मनामध्ये जर सतत शंका वाटली की, माझ्या बोलण्याचे काय अर्थ निघतील तर गोपीनाथ मुंडेंना अपेक्षित राजकारण मी करू शकणार नाही. (…then I will not be able to do the politics expected by Gopinath Munde; Pankaja Munde spoke clearly

पंकजा मुंडे म्हणाल्या की, खरं तर कधी कधी चांगलं किर्तन ऐकल्यावर मला बरं वाटतं, त्यामुळे आपण कधी कधी राजकारणातही किर्तन केले पाहिजे. तुम्हाला एकनाथ मुंडे म्हणाले होते की, मलाही किर्तन करता येते, तस मलाही फार आवड आहे, अध्यात्माचि, भागंवत, भगवतगीता, रामायण तिथले दाखले असतील आणि हे दाखले असे आहेत की, ते कुठल्याही काळामध्ये तेवढेच उत्कुष्ट बसतात जसे महाराजांनी सांगितले आहे, कपडे कोणाला बसायचे ते बसतात, आम्ही आमचे कपडे शिवून घेतो. अशाच अर्थाने गेली 19 वर्ष मी राजकारण करते आहे. 2014 ला एकनाथ मुंडे यांनी मला प्रचाराला उभे केले. तेव्हा त्यांनी मला सांगितले की, मला स्वच्छ आणि कोरी पाटी असलेला चेहरा पाहिजे आणि तु माझा प्रचार कर. त्यामुळे मी एकनाथ मुडेंचा प्रचार केला. तेव्हापासून आज 2023 पर्यंत मी सार्वजनिक जीवनात आहे. पण गेल्या 5 वर्षांमध्ये जे अनुभव आले ते फार अनोखे आहेत, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

- Advertisement -

गोपीनाथ मुंडेंना अपेक्षित राजकारण करू शकणार नाही
पंकजा मुंडे म्हणाल्या की, आज मी माझ्या वडिलांच्या जाण्यानंतरच्या पुण्यस्मरणामध्ये थोडीशी मनामध्ये दु:खी होऊन थोड्याशा त्यांच्या आठवणी दाबून, अश्रू दाबून आलेल्या सगळ्या नेत्यांचे मनापासून आभार मानते. आज इथे उपस्थिती लोकांमुळे आणि भक्तांमुळे या कार्यक्रमाची गरीमा ठीकून आहे. मी याठिकाणी बोलायचा प्रयत्न करत असताना माझ्या मनामध्ये जर सतत शंका वाटली की, माझ्या बोलण्याचे काय अर्थ निघतील तर गोपीनाथ मुंडेंना अपेक्षित राजकारण मी करू शकणार नाही. ज्या दिवशी समोरच्या माणसाला जे आवडेल ते बोलणार नाही, त्यादिवशी मला राजकारणाच्या मंचावर उभे राहण्याचा अधिकार राहणार नाही, असे स्पष्ट मत पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -