घरमहाराष्ट्रनाशिक - उ. महाराष्ट्रश्रीरामांवर एकट्याची मक्तेदारी नाही : रोहित पवार

श्रीरामांवर एकट्याची मक्तेदारी नाही : रोहित पवार

Subscribe

खर्डा किल्ल्यासमोर सर्वात उंच रावणाच्या प्रतीकृतीचे दहन

जामखेड : जे लोक चांगल्या वृतीने वागतात चांगले काम करतात त्यांच्या सर्वांच्या मनामध्ये श्रीराम आहे. त्यामुळे भगवान श्रीराम हे सगळ्यांचे आहेत ते कोण्या एकट्याची मक्तेदारी नाही. धर्माचा, अध्यात्माचा वापर व्यक्तिगत हितासाठी करू नये. असा भाजपवर अप्रत्यक्ष घणाघात खर्डा येथील रावणाच्या प्रतीकतीचे दहन कार्यक्रमात आमदार रोहित पवार यांनी केला.
जामखेड तालुक्यातील खर्डा येथे असलेल्या शिवपट्टन किल्ल्यासमोर आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून यंदा वीजयादशमीच्या मुहूर्तावर जगातील सर्वात उंच स्वराज्य ध्वजाची उभारणी करण्यात आली होती. यंदाच्या वर्षी आमदार रोहित पवार यांनी महाराष्ट्रातील आजवरच्या सर्वात उंच म्हणजेच ७५ फुटी रावणाच्या प्रतीकृतीचे दहन स्वराज्य ध्वजाच्या साक्षीने खर्डा किल्ल्यासमोर केले. या दिमाखदार सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या सन्माननीय व्यक्तींसह हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

खर्डा किल्ल्यासमोर आयोजित केलेल्या या रावण दहन सोहळ्यासाठी माजी खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती, रामायण या प्रसिध्द पौराणिक मालिकेतील राम, सीता आणि लक्ष्मण यांची भूमिका साकारलेले कलाकार व आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू केदार जाधव हे देखील उपस्थित होते. उत्साहाच्या वातावरणात हा सोहळा पार पडला. यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी धनुष्यबाण सोडून सध्या महाराष्ट्रासह अखंड देशाला भेडसावत असलेल्या १० महत्त्वाच्या असलेल्या समस्या महागाई, भ्रष्टाचार, बेरोजगारी, स्त्री असुरक्षा, जाती-धर्म भेद, बालमजुरी, शेतकरी आत्महत्या, पर्यावरण नाश, अवैज्ञानिकता व दारिद्रय. या रावणाच्या प्रतिकृतीच्या रुपात दहन केले.

- Advertisement -

यावेळी आलेल्या विविध क्षेत्रातील मान्यवरांनीही अनेक समस्या लिहून दिल्या आणि त्यांचेदेखील यावेळी दहन करण्यात आले. रावण दहन केल्यानंतर मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतिषबाजी पाहायला मिळाली. या ठिकाणी काही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस यंत्रणेच्या मार्फत खबरदारी घेण्यात आली होती.

आमदार रोहित पवार व आमच्यात साम्यता आहे ती म्हणजे ‘स्वराज‘शब्द. कारण त्यांनी स्वराज्याचे प्रतीक खर्डा किल्ल्यावर उभारले आहे व मी स्वराज्य संघटनेच्या माधमातून लोकांपर्यंत येणार आहे. हा स्वराज्य ध्वज व स्वराज्य एकत्र आणणार आहे. : युवराज संभाजीराजे छत्रपती

श्रीमंतापासून गरीबांपर्यंत सर्वांना समान हक्क, अधिकार, न्याय व निस्वार्थी वृती व निर्मळ मानाने कारभार करणे म्हणजे रामराज्य आहे. : रोहित पवार, आमदार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -