घरमहाराष्ट्रराजकीय संभ्रम आहे, पण मविआ एकत्र; अशोक चव्हाणांनी दिले स्पष्टीकरण

राजकीय संभ्रम आहे, पण मविआ एकत्र; अशोक चव्हाणांनी दिले स्पष्टीकरण

Subscribe

शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीबाबत ठाकरे गटाचे नेते आणि काँग्रेसच्या नेत्यांकडून आपापले मत व्यक्त करण्यात येत आहे. संजय राऊत, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, पृथ्वीराज चव्हाण यांच्यानंतर आता माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी देखील या भेटीवरून प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई : शनिवारी (ता. 12 ऑगस्ट) उद्योजक चोरडिया यांच्या पुण्यातील बंगल्यावर शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये भेट झाली. कौटुंबिक नात्यामुळे ही भेट झाली असल्याची माहिती अजित पवार आणि शरद पवार या दोघांकडूनही देण्यात येत आहे. परंतु, या भेटीनंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू झालेल्या आहेत. अजित पवार यांनी शरद पवार यांना सत्तेत येण्यासाठी पुन्हा विनंती केली असून यासाठीच ही भेट घेतल्याचे सांगण्यात येत आहे. काका आणि पुतण्यामध्ये भेटीगाठी वाढल्याने आता ठाकरे गट आणि काँग्रेस पक्ष मोठ्या संभ्रमावस्थेत पडला आहे. तर शरद पवार हे देखील आता त्यांची राजकीय खेळी खेळत सत्तेत सहभागी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा – Sanjay Raut : देश ‘त्या’ शुभ घटनेची वाट पाहतोय, संजय राऊतांचा आशावाद

- Advertisement -

या भेटीबाबत ठाकरे गटाचे नेते आणि काँग्रेसच्या नेत्यांकडून आपापले मत व्यक्त करण्यात येत आहे. संजय राऊत, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, पृथ्वीराज चव्हाण यांच्यानंतर आता माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी देखील या भेटीवरून प्रतिक्रिया दिली आहे. आज मुंबईत काँग्रेसच्या महत्त्वाच्या नेत्यांची एमसीए क्लबमध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्रसार माध्यमांशी अशोक चव्हाण यांनी संवाद साधला. (There is political confusion but MVA united; Explanation given by Ashok Chavan)

यावेळी बोलताना ते म्हणाले की, काँग्रेसने कोणताबी A B C प्लॅन तयार केलेला नाही. राज्यात सुरू असलेल्या राजकारणामुळे लोकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. कारण, पवारांकडून कौटुंबिक विषय असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे राजकीय दृष्ट्या संभ्रमाचे वातावरण जे काही निर्माण झाले आहे ते नाकारता येत नाही. त्यामुळे या वातावरणासंदर्भात शरद पवारांनी लवकर भूमिका स्पष्ट करून कामाला लागले तर चांगले होईल, असे चव्हाणांकडून सांगण्यात आले. आमचा विषय सोडा पण सामान्य माणसाचा विचार करा, असेही चव्हाणांकडून सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढविण्याची तयारी करत आहे का? या प्रश्नाला उत्तर देत अशोक चव्हाण म्हणाले की, पक्ष अद्याप कोणत्याही निष्कर्षावर आलेला नाही. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आमच्या तिघांमधील युती कायम आहे. अन्य लहान पक्ष देखील आमच्यासोबत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या जडणघडणीमध्ये कोणताही फरक पडलेला नाही. परंतु, राष्ट्रवादीमध्ये घडलेल्या घटनेमुळे संभ्रम नक्कीच निर्माण झाला आहे. तसेच, आम्ही मविआच्या माध्यमातूनच निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त करत आहोत. एकत्र लढल्यावर महाराष्ट्रातील निकाल चांगले येतील, असा दावा यावेळी अशोक चव्हाण यांच्याकडून करण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -