Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र शरद पवार आणि उद्धव ठाकरेंमध्ये बंद दाराआड दीड तास चर्चा, भेटीचे कारण...

शरद पवार आणि उद्धव ठाकरेंमध्ये बंद दाराआड दीड तास चर्चा, भेटीचे कारण आले समोर

Subscribe

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज (ता. 12 सप्टेंबर) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा यांची ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांनी भेट घेतली. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भेट घेतली. यावेळी तब्बल दीड तास या चौघांमध्ये चर्चा झाली.

मुंबई : लवकरच देशात लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजू शकते, अशी शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांकडून यासाठी मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. महाराष्ट्रातही आगामी निवडणुका लढण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज (ता. 12 सप्टेंबर) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा यांची ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांनी भेट घेतली. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भेट घेतली. यावेळी तब्बल दीड तास या चौघांमध्ये चर्चा झाली. आजच्या या भेटीमध्ये जागा वाटपासंदर्भात चर्चा झाल्याचे जयंत पाटील यांच्याकडून सांगण्यात आले आहे. (There was a discussion between Sharad Pawar and Uddhav Thackeray on seat sharing)

हेही वाचा – जनसंवाद यात्रेतून नाना पटोलेंनी साधला भाजपवर निशाणा, म्हणाले – “सरकारचा अन्यायी, अत्याचारी कारभार…”

- Advertisement -

सिल्व्हर ओकवर उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांची भेट घेतल्यानंतर जयंत पाटील यांनी या बैठकीबाबतची माहिती प्रसार माध्यमांना दिली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, जागा वाटप लवकरात लवकर पूर्ण करावे. त्यासाठी काँग्रेससोबत चर्चा होणे आवश्यक आहे. उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण हे सर्व मंडळी भविष्यात जागा वाटपावर चर्चा करण्यासाठी एकत्रितपणे बसतील, अशी माहिती त्यांनी दिली. त्यामुळे लवकरच आता महाविकास आघाडीमधील जागा वाटपाबाबतचा फॉर्मुला ठरू शकतो, असे सांगण्यात येत आहे.

तर या बैठकीबाबत ठाकरे गटाचे प्रमुख नेते आणि खासदार संजय राऊत यांच्याकडूनही माहिती देण्यात आली आहे. इंडिया आघाडीच्या समन्वयक समितीची उद्या महत्त्वाची बैठक आहे. त्या बैठकीला 13 जणांची समिती उपस्थित राहून तिथे अनेक निर्णय होतील. काही नवीन विषय समोर आलेले आहेत. महाराष्ट्र हे महत्त्वाचे राज्य असल्यामुळे महाविकास आघाडीच्या संदर्भातील काही महत्त्वाचे मुद्दे चर्चेत आले. त्या संदर्भात कोणते विषय घ्यावेत, पुढे जावेत याबाबत चर्चा झाली, असे संजय राऊत यांच्याकडून सांगण्यात आले आहे. तसेच, या चर्चेनंतर उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस नेत्यांशी दुरध्वनीवर चर्चा केली. कारण काँग्रेस नेते नाना पटोले आणि इतर नेते त्यांच्या पक्षाच्या एका यात्रेत सहभागी आहेत. त्यामुळे त्यांच्यासोबत फोनवर चर्चा केली, अशी माहिती राऊतांनी प्रसार माध्यमांना दिली.

- Advertisement -

महाराष्ट्रातील अनेक मुद्दे आहेत. महाराष्ट्रात दुष्काळ आहे, मराठा समाजाच्या आंदोलनाला वेगळे वळण लागले आहे, सरकार अपयशी आहे. सरकारने विशेष अधिवेशन का बोलावले आहे, या संदर्भात सर्वात जास्त संभ्रम महाराष्ट्रात आहे. नाना पटोले यांनी भूमिका मांडलीय की महाराष्ट्र तोडण्यासाठी हे अधिवेशन आहे. अनेक विषय आहेत. त्यावर चर्चा झाली असल्याचेही संजय राऊतांनी सांगितले. परंतु, या भेटीबाबतचे फोटो शरद पवार यांनी त्यांच्या X या ट्विटर हँडलवरून शेअर केले आहे.

- Advertisment -