घरमहाराष्ट्र"जे लोक मनाने मोठे असतात ते...", Deepak Kesarkar यांनी केले नारायण राणेंचे तोंड भरून कौतुक

“जे लोक मनाने मोठे असतात ते…”, Deepak Kesarkar यांनी केले नारायण राणेंचे तोंड भरून कौतुक

Subscribe

महाराष्ट्रातील सर्वात छोट्या जिल्ह्याला तीन मंत्री आणि एक केंद्रीय मंत्री लाभलेले आहेत. आपण सर्वांनी एकत्र येऊन काम काम केले पाहिजे, असे वक्तव्य मंत्री दीपक केसरकर यांनी केले आहे.

सिंधुदुर्ग : मंत्री दीपक केसरकर यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे सिंधुदुर्गातील एका कार्यक्रमात तोंड भरून कौतुक केले आहे. आमचे वैचारिक भांडण होते. जे लोक मनाने मोठे असतात. ते भांडणे फार काळ चालू ठेवत नाहीत, असे वक्तव्य दीपक केसरकर यांनी केले आहे. काही दिवसांपूर्वी देखील दीपक केसरकरांनी नारायण राणेंची भेट घेतली होती. तेव्हाही दीपक केसरकरांची नारायण राणेंचे कौतुक केलेच होते आणि आता पुन्हा कार्यक्रमात भाषण करताना त्यांचे कौतुकांचा वर्षाव केला होता.

दीपक केसरकर म्हणाले, “आमचे वैचारिक भांडण होते. जे लोक मनाने मोठे असतात. ते भांडणे फार काळ चालू ठेवत नाहीत. आज सुद्धा मी आणि राणेसाहेब एकत्र होतो. अनेक वेळेला मी आणि राणेसाहेब भेटतो. आम्ही एकत्र भेटतो आणि काम करतो. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. राणेसाहेबांचे योगदान सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी निश्चितपणे राहलेले आहे. मुख्यमंत्री असताना किंवा उपमुख्यमंत्री असताना जिल्ह्याला त्यांनी मोठ्या प्रमाणात निधी दिलेला आहे. यामुळे अनेक वेळेला ज्यांना वैचारिक मतभेद असतात, ते कुठे संपवायचे हे सुद्धा ठरवायला लागते. आमचे वय असल्यामुळे आम्ही हे समजतो. अनेक लोकांना ते समजत नाहीत. यामुळे विनाकारण लहान लहान गोष्टींतून वाद निर्माण होत असतो.”

- Advertisement -

हेही वाचा – मोदींचा पराभव केल्याशिवाय संविधान आणि लोकशाही वाचणार नाही – Sanjay Raut

छोट्या जिल्ह्याला 3 मंत्री आणि 1 केंद्रीय मंत्री 

दीपक केसरकर म्हणाले, “महाराष्ट्राच्या राजकारणात पहिल्यांदा घडलेले आहे की, राज्यातील कुठल्याही जिल्ह्याला तीन मंत्री आणि एक केंद्रीय मंत्री नाही. पण महाराष्ट्रातील सर्वात छोट्या जिल्ह्याला तीन मंत्री आणि एक केंद्रीय मंत्री लाभलेले आहेत. आपण सर्वांनी एकत्र येऊन काम काम केले पाहिजे. राणेसाहेबांचे जे खाते आहे. त्या खात्यात मोठ्या प्रमाणात क्रांती होऊ शकते आणि युवकांना रोजगार मिळ शकतो. आमच्या उदय सामंत यांच्याकडे जे खाते आहे. यातून मोठ्या प्रमाणात उद्योग आपल्या भागात येऊ शकतात.”

- Advertisement -

हेही वाचा – Sanjay Raut : भाजपाच्या यशात कमलनाथांचे मोठे योगदान; संजय राऊतांनी काँग्रेसला केले सावध

राणे-केसरकर यांचीतील वाद

नारायण राणे आणि दीपक केसरकर हे एकेकाळी बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेतील मोठे नेते. राणे आणि केसरकर हे एकाच जिल्ह्यातील दोन नेते असून देखील या दोघांमध्ये राजकारणात टोकाचा संघर्ष आहे. शिवसेनेत असताना दीपक केसरकर यांनी राजकीय दहशतवाद, असे म्हणत कायमच राणे यांना लक्ष केले होते. गेल्या वर्षीही एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेना आणि भाजपाने एकत्र सत्ता स्थापन केली. तेव्हा अन्य नेत्यांचे वाद मिटले. पण राणे-केसरकर वाद आणखीनच उफाळून आला होता. यावेळी राणे-केसरकर यांच्या पारंपारिक वादात नारायण राणे यांचा मोठा मुलगा निलेश राणे यांनीही उडी घेत केसरकरांवर जोरदार टीका केली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -