घरक्राइमअ‍ॅप लोन फेडूनही ५० नंबर्सवरून धमकीचे कॉल

अ‍ॅप लोन फेडूनही ५० नंबर्सवरून धमकीचे कॉल

Subscribe

नाशिक : शहरात सायबर क्राईममध्ये वाढ झाली असून, लोन अ‍ॅपद्वारे आर्थिक फसवणूक आणि बदनामीचे प्रकार वाढले आहेत. विशेष म्हणजे, नाशिक शहर सायबर पोलिसांकडे दररोज लोन अ‍ॅपसंडर्भात १० तक्रारी येत आहेत. शहरातील एका रसवंतीचालकास चार दिवसांत तब्बल ५० हून अधिक धमक्यांचे कॉल आहेत. फसवणुकीसाठी न्यूड करत हिंदी भाषिक महिलेने रसवंतीचालकास पैसे दिले नाही तर कायदेशीर कारवाई करण्याची धमकीसुद्धा दिल्या समोर आले आहे.

ऑनलाइन सहज कर्ज उपलब्ध होत असल्याने लोन अ‍ॅपचा वापर वाढला आहे. या माध्यमातून अ‍ॅप वापरकर्त्यांना किरकोळ रक्कम तात्काळ मिळते. मात्र, या प्रक्रियेत मोबाईलमधील खासगी माहितीचा वापर करण्याची अनुमती कंपनीला द्यावी लागते. कर्जाचे हप्ते भरले नाहीत किंवा अनेकदा कर्ज फिटल्यानंतरही कंपनीकडून संदेश पाठवण्यात येतात. मोबाईलमध्ये सेव्ह असलेल्या इतर क्रमांकावर संबंधित व्यक्तीची माहिती पाठवली जाते. संपर्क यादीतील लोकांना संदेश पाठवून कर्जाची रक्कम भरायला सांगा, असे बजावले जाते. मोबाईलमधील खासगी माहितीचा वापर करण्याची परवानगी दिल्याने छायाचित्रांचा वापर करून बदनामी करण्याचेही प्रकारही शहरात घडले आहेत. लोन अ‍ॅपच्या माध्यामातून फसवणूक व बदनामी करण्याचे गुन्हे प्रामुख्याने पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, बिहार, कर्नाटक, झारखंड या राज्यांतून घडवले जातात. या राज्यांमध्ये सायबर पोलीस पथकांची कमतरता असल्याने या टोळ्या देशभरात धुमाकूळ घालत आहेत.

- Advertisement -

लोन अ‍ॅपवरून नाशिक शहरातील एका रसवंतीचालकाने ६ हजार पाचशे रुपयांचे कर्ज घेतले. ते त्याने वेळेत फेडले. तरीही अनोळखी मोबाईल क्रमांकावरुन रसवंतीचालकास अवघ्या चार दिवसांत ५० कॉल्स आहेत. यातील अनेक कॉल्स न्यूड, धमक्या व अश्लिल भाषेत शिवीगाळ केल्याचे आहेत. त्यातून रसवंतीचालकाची मनस्थिती खराब झाली आहे.

कर्ज घेतले अन् अडकलो

आर्थिक अडचण असल्याने गरजेपोटी सागरने (बदलेले नाव) लोन अ‍ॅपद्वारे सहा हजार पाचशे रुपयांचे कर्ज घेतले. मुदतीत सर्व पैसे परत केले. तरीही, अनोळखी मोबाईलक क्रमांकांवरुन कॉल्स आणि अश्लिल मेसेज सुरु झाले. काही न्यूड कॉल्ससुद्धा आले. चार दिवसांत सतत धमक्या आणि बदनामी असा मानसिक त्रास सुरू होता. लोन अ‍ॅपवरून पैसे घेतले नसते तर बरे झाले असते. लोन अ‍ॅपवरुन कोणीही पैसे घेवू नयेत, असे सागरने सांगितले.

लोन अ‍ॅप ट्रॅामध्ये अडकल्यावर अशी घ्या काळजी

  • तक्रारदारांनी घाबरून न जाता मोबाईलमध्ये इन्स्टॉल केलेले लोन अ‍ॅप अनइन्स्टॉल करावे. अ‍ॅप हे थर्ड पार्टी अ‍ॅप असल्याने मोबाईलमधील युवर गूगल अकाऊंटमध्ये जावून सिक्युरीटा फीचरमध्ये मॅनेज थर्ड पार्ट अ‍ॅक्सेसमध्ये जावे. त्यानंतर डाऊनलोड केलेले लोन अ‍ॅप रीमूव्ह अ‍ॅक्सेस करून काढून टाकावे.
  • व्हॉट्सअ‍ॅप कॉन्टॅक्टमधील सर्व मोबाईल क्रमांक ब्रॉडकास्ट लिस्ट तयार करून मोबाईल हॅक झाला आहे. हॅकरने कॉन्टॅक्ट लिस्ट, फोटो गॅलरी चोरली असल्याची माहिती द्यावी. हॅकर कुटुंबियांचे फोटो मॉर्फ किंवा एडिट करून व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल करीत आहे. हॅकरने पाठवलेले फोटो, व्हिडीओ ओपन करु नये. ज्या मोबाईल क्रमांकावरून फोटो व व्हिडीओ आले तो क्रमांक तात्काळ रिपोर्ट व ब्लॉक करावा, असा मेसेज तयार करुन तो ब्रॉडकास्ट लिस्टवर सेंड करावा.

आर्थिक अडचणीवेळी लोन अ‍ॅपचा वापर करु नये. या अ‍ॅपच्या माध्यमातून नाशिक शहरात दररोज १० जणांची फसवणूक केली जात आहे. अनोळखी मोबाईल क्रमांकावरून आलेले कॉल्स घेवू नये, मदतीसाठी पोलिसांशी संपर्क साधावा. : डॉ. सीताराम कोल्हे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस ठाणे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -