घरमहाराष्ट्रमुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात; तीन प्रवाशांचा मृत्यू तर १६ जखमी

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात; तीन प्रवाशांचा मृत्यू तर १६ जखमी

Subscribe

मुंबई-पुणे मार्गिकेवर थांबलेल्या ट्रकला आदळून या बसचा भीषण अपघात झाला.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात झाला असून यामध्ये तीन प्रवाशांचा मृत्यू तर १६ प्रवाशी जखमी झाले आहेत. सयाजी पांडुरंग पाटील (वय ६५), संभाजी शिवाजी पाटील (वय ४५) आणि मोहनकुमार शेट्टी (वय ४२) अशी मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. तसंच जखमी झालेल्या प्रवाशांना खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. मतदान करण्यासाठी सातारा जिल्ह्यातील वाझोळी गावचे रहिवाशी मूळगावी जात असताना हा भीषण अपघात झाला.

पोलिसांच्या माहितीनुसार, मौजे बोर गावाजवळ ट्रकचा टायर फुटल्याने मुंबई-पुणे मार्गीकेवर तो थांबवण्यात आला होता. यादरम्यान मुंबईहून कोल्हापूरकडे जाणारी जय भवानी ट्रॅव्हल्स जात होती. मात्र अंधारात थांबवलेल्या ट्रकवर जय भवानी ट्र्रॅव्हल्स आदळली. या अपघात गंभीर झालेल्या प्रवाशांना सोमाटणे फाटा या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

- Advertisement -

अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांची नावे

१) बाबासाहेब पांडुरंग पाटील
२) सुवर्णा बाबासाहेब पाटील
३) गणेश अरुण पाटील
४) सूरज आनंदराव पाटील
५) शैलेश हनुमंत पाटील
६) अनिल मधुकर पाटील
७) जयसिंग खाशाब पाटील
८) विश्वनाथ तुकाराम पाटील
९) आकाश जयसिंग पाटील
१०) भिवाजी चंदू पाटील
११) विशाल किसन पाटील
१२) तुकाराम सावळाराम भिंगारदिवे
१३) मंगल जयसिंग पाटील
१४) शंकर थोरात
१५) राणी मंगेश देसाई

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -