घरमहाराष्ट्रनाशिक‘पदवीधर’ची आज प्रारूप मतदार यादी; एकूण १ लाख ९१ हजार मतदारांचे अर्ज

‘पदवीधर’ची आज प्रारूप मतदार यादी; एकूण १ लाख ९१ हजार मतदारांचे अर्ज

Subscribe

नाशिक : नाशिक पदवीधर मतदारसंघाची प्रारूप मतदार यादी बुधवारी (दि. २३) प्रसिद्ध करण्यात येणार आहे. विभागात पाचही जिल्ह्यांमध्ये ७ नोव्हेंरबरपर्यंत १ लाख ९१ हजार ३३८ अर्ज प्रशासनाकडे प्राप्त झाले आहेत.

२०२३ च्या फेब्रुवारी महिन्यात नाशिक पदवीधर मतदारसंघाची मुदत संपुष्टात येत आहे. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या दृष्टीने पहिल्या टप्यात मतदार नोंदणीची प्रक्रिया हाती घेतली आहे. त्यानुसार विभागातील नाशिक, नगर, धुळे, नंदूरबार व जळगाव या पाचही जिल्ह्यात १ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर या कालावधीत पदवीधरांची मतदार नोंदणी राबविण्यात आली. त्यात विभागातून ऑफलाईन १ लाख ३१ हजार ७४४ तर ऑनलाईनच्या माध्यमातून ५९ हजार ५९४ अर्ज जिल्हा प्रशासनांकडे प्राप्त झाले. त्यापैकी १ लाख ३० हजारांहून अधिक अर्जांच्या डेटा एन्ट्रीचे काम प्रशासनांनी पूर्ण केले असून २ हजार ८६१ अर्ज बाद ठरविण्यात आले. दरम्यान, विभागातील पाचही जिल्ह्यांमध्ये प्रारूप मतदार यादी बुधवारी (दि.२३) प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या यादीवर ९ डिसेंबरपर्यंत हरकती व सूचना नोंदविण्याची मुदत असेल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

- Advertisement -

पदवीधर मतदारसंघाची मंगळवारी (दि.२३) प्रारूप यादी प्रसिद्ध केली जाणार असली तरी अंतिम यादीची प्रसिद्धी ३१ डिसेंबरला होईल. त्यामुळे या कालावधीत पदवीधरांना या मतदारसंघासाठी नोंदणी करता येईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -