घरमहाराष्ट्र२० सनदी अधिकार्‍यांच्या बदल्या सुजाता सौनिक नव्या गृह सचिव,तुकराम मुंढे मराठी भाषाचे...

२० सनदी अधिकार्‍यांच्या बदल्या सुजाता सौनिक नव्या गृह सचिव,तुकराम मुंढे मराठी भाषाचे सचिव

Subscribe

सर्वसाधारणपणे मे महिन्याच्या अखेरपर्यंत बदल्यांचे आदेश निघतात, पण शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्र्यांच्या दबावामुळे सरकारी अधिकारी, कर्मचार्‍यांच्या बदल्यांना ३० जूनपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय नुकताच सरकारने घेतला होता. सामान्य प्रशासन विभागाने मंगळवारी यासंदर्भातील शासन निर्णय जारी केल्यानंतर शुक्रवारी शिंदे-फडणवीस सरकारने २० सनदी अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या. यामध्ये नेहमी वादाच्या भोवर्‍यात असलेले तुकराम मुंढे यांची प्रथेनुसार अवघ्या महिनाभरातच मराठी भाषा विभागाचे सचिव म्हणून बदली करण्यात आली आहे.

याआधी ते कृषी व पशुसंवर्धन खात्यात सचिव म्हणून कार्यरत होते, तर राज्याचे मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्या पत्नी आणि सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांची अपेक्षेनुसार अपर मुख्य सचिव (गृह) पदावर बदली करण्यात आली आहे. एमएमआरडीएचे महानगर आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास यांची धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे ओएसडी म्हणून बदली करण्यात आली आहे. विशेष म्हणजे श्रीनिवास हे ६ वर्षांपूर्वी धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे ओएसडी याच पदावर कार्यरत होते. एका अर्थाने त्यांची ही पदावनती असल्याचीच चर्चा रंगली आहे.

- Advertisement -

सामान्य प्रशासन विभागाने जारी केलेल्या आदेशानुसार नाशिक महापालिका आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांची पुणे येथे साखर आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. महिला व बालविकास विभागाच्या प्रधान सचिव इड्जेस कुंदन यांची अल्पसंख्याक विकास विभागात प्रधान सचिव म्हणून बदली करण्यात आली आहे. या पदावर अनुप कुमार यादव कार्यरत होते. त्यांच्या जागी कुंदन यांची बदली करण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांची गृह विभागात बदली करण्यात आली आहे. अपर मुख्य सचिव (गृह) पदावर सैनिक यांची बदली करण्यात आली आहे. या पदावर दिनेश वाघमारे कार्यरत होते. आता सैनिक या पदी काम करतील.

पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजीव जयस्वाल यांची म्हाडामध्ये बदली करण्यात आली आहे. म्हाडाचे उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून जयस्वाल हे काम करतील. अनिल डिग्गीकर हे या पदावर कार्यरत होते. कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त कादंबरी बलकवडे यांची महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण विभागाचे महासंचालक म्हणून बदली करण्यात आली आहे. एमएमआरडीएचे महानगर आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास यांची धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे ओएसडी म्हणून बदली करण्यात आली आहे.

- Advertisement -

बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्रा यांची महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेडचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक म्हणून बदली करण्यात आली आहे, तर आतापर्यंत हा पदभार सांभाळणारे मुख्य व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांची बेस्टच्या महाव्यवस्थापकपदी बदली करण्यात आली आहे. राधिका रस्तोगी यांची प्रधान सचिव आणि विकास आयुक्त म्हणून नियोजन विभागात बदली करण्यात आली आहे. एम. एस. खाडी गाव औद्योगिक बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अंशू सिन्हा यांची ओबीसी बहुजन कल्याण विभागाच्या सचिव म्हणून बदली करण्यात आली आहे.

अल्पसंख्याक विकास विभागाचे सचिव अनुप कुमार यादव यांची महिला व बालकल्याण विभागाचे सचिव म्हणून बदली करण्यात आली आहे. कृषी व पशू संवर्धन खात्याचे सचिव असलेे तुकाराम मुंढे यांची मराठी भाषा विभागात सचिव म्हणून बदली करण्यात आली आहे. एमएमबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अमित सैनी यांची जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक म्हणून बदली करण्यात आली आहे. अतिरिक्त विकास आयुक्त (औद्योगिक) डॉ. माणिक गुरसल यांची महाराष्ट्र मेरिटाईम मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली करण्यात आली आहे.

एसबीएम (ग्रामीण) पाणी पुरवठा विभागाचे सहसचिव व प्रकल्प संचालक प्रदीपकुमार डांगे यांची रेशीम संचालक (नागपूर) म्हणून बदली करण्यात आली आहे. मनरेगाचे (नागपूर) आयुक्त शंतनू गोयल यांची नवी मुंबई सिडकोचे सहमहाव्यवस्थापकपदी बदली करण्यात आली आहे. लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांची माहिती व तंत्रज्ञान विभागाचे संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. एनआरएलएमचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर यांची पशुखाद्य विभागाच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. डॉ. सुधाकर शिंदे यांची मुंबईचे सहाय्यक महापालिका आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेचे सहाय्यक आयुक्त आशिष शर्मा यांची नगरविकास विभागाचे प्रधान सचिव म्हणून बदली करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -