घरमहाराष्ट्रशेखर सिंग पिंपरी चिंचवड पालिका आयुक्त तर, जयश्री भोज माहिती तंत्रज्ञानच्या संचालक

शेखर सिंग पिंपरी चिंचवड पालिका आयुक्त तर, जयश्री भोज माहिती तंत्रज्ञानच्या संचालक

Subscribe

मुंबई : सत्ताधारी बदलल्यानंतर आपल्या मर्जीतील अधिकाऱ्यांना चांगली पोस्टींग दिली जाते हा पायंडा शिंदे-फडणवीस सरकारनेही कायम ठेवला आहे. शेखर सिंग यांची पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्तपदी तर, जयश्री भोज यांची महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी बदली करण्यात आली आहे.

जयश्री भोज या महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक होत्या. त्यांची बदली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडील माहिती तंत्रज्ञान खात्याच्या अखत्यारित असलेल्या महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळाच्या संचालकपदावर करण्यात आली आहे. तर, पिंपरी-चिंचवडच्या महापालिका आयुक्तपदी शेखर सिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांची महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळावर व्यवस्थापकीय संचालक म्हणून बदली करण्यात आली आहे.

- Advertisement -

याशिवाय, हाफकिन बायो-फार्मा कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक मदन नागरगोजे यांची लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून बदली करण्यात आली आहे. तर, सुमन चंद्रा यांची हाफकिन बायो-फार्मा कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

अलीकडेच काही अधिकाऱ्यांच्या बदल्या

- Advertisement -

शिंदे सरकारचा कारभार सुरू झाल्यावर अवघ्या काही दिवसातच माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या खास मर्जीतील साहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांच्यासह अन्य दोन अधिकाऱ्यांची तात्काळ उचलबांगडी करण्यात आली.
किरण दिघावकर यांची, जी/ उत्तर विभागाच्या सहाय्यक आयुक्त पदावरून ‘ई’ वार्ड भायखळा येथे ४ जुलै रोजी बदली करण्यात आली होती. तर त्यांच्या जागेवर के/ पूर्व वार्डचे सहाय्यक आयुक्त प्रशांत सपकाळे यांची नेमणूक करण्यात आली. त्यावेळी, किरण दिघावकर यांनी, प्रशासकीय कारणास्तव बदली करण्यात आल्याचे सांगितले. मात्र कारण वेगळेच असल्याचे त्यावेळी बोलले जात होते.

आता पुन्हा एकदा म्हणजे १२ ऑगस्ट रोजी किरण दिघावकर यांची साहाय्यक आयुक्त ‘ई’ विभाग या पदावरून उचलबांगडी करून त्यांना साहाय्यक आयुक्त पी/ उत्तर विभाग या ठिकाणी पाठविण्यात आले आहे. त्यांच्या सोबतच एफ/दक्षिण साहाय्यक आयुक्त स्वप्नजा क्षिरसागर यांची ‘ए’ विभाग साहाय्यक आयुक्तपदी, तर पी/ उत्तर साहाय्यक आयुक्त महेश पाटील यांची एफ/ दक्षिण विभाग साहाय्यक आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. तसेच, अजय कुमार यादव, कार्यकारी अभियंता ( परिवहन) यांच्याकडे साहाय्यक आयुक्त ‘ई’ विभाग यांचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे.

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -