घरमहाराष्ट्रमुंबई ते अहमदाबाद प्रवास जल्लोषात

मुंबई ते अहमदाबाद प्रवास जल्लोषात

Subscribe

महिलांसाठी विशेष स्पर्धा

मुंबई ते अहमदाबाद धावणारी देशातील दुसरी खासगी ट्रेन तेजस एक्सप्रेसमध्ये रविवारी जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तसेच महिला प्रवाशांना चॉकलेट आणि पुष्प देऊन त्यांचे स्वागत केले.याचबरोबर प्रश्नमंजुषाचे आयोजन करण्यात आले होते. प्रत्येक डब्यामध्ये हा खेळ सुरू असताना, विजयी महिलांना सौदर्य प्रसाधनांचे पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

अहमदाबादमध्ये चढत असताना खास करुन महिला प्रवाशांचे लेडी ट्रेन कॅप्टन, प्रभजोत यांनी पुष्प आणि चॉकलेट्ससह स्वागत केले. प्रवासादरम्यान तेजस एक्स्प्रेसच्या कर्मचार्‍यांनी दोन्ही दिशेने धावणार्‍या तेजस एक्सप्रेसच्या प्रत्येक डब्यामध्ये प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन केले होते. यावेळी भाग घेणार्‍या विजयी महिला प्रवाशांना खास जूट स्लिंग बॅग भेटवस्तू आणि योग्य उत्तरे दिल्यास प्रचलित ब्रँडचे सौंदर्य प्रसाधने ही प्रवाशांना भेट देण्यात आली. यावेळी गुजरात आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांना एकमेकांमधील समृद्ध परंपरा, संस्कृती, उद्योग आणि ऐतिहासिक बाबींविषयी विशेष प्रश्न विचारण्यात आले होते. त्यामुळे रविवारी खासगी तेजस एक्स्प्रेसमध्ये महिला प्रवाशांना आनंदात प्रवास झाला आहे.

- Advertisement -

दैनिक ‘आपलं महानगर’शी बोलताना आयआरसीटीसीचे जनसंपर्क अधिकारी पिनाकिन मोरावाला यांनी तेजस एक्स्प्रेसच्या संपूर्ण आयआरसीटीसी परिवाराच्या वतीने सर्व महिलांना आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. महिलांना त्यांच्या दैनंदिन जीवनात असंख्य आव्हानांचा सामना करावा लागतो आणि तरीही प्रत्येक बाबतीत त्या विजयी होऊन बाहेर येतात. त्यासाठी आयआरसीटीसी अशा सर्व महिलांचा सन्मान करत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -