घरताज्या घडामोडीNPPA ANNOUNCES : १ एप्रिलपासून अत्यावश्यक औषध महागणार, ११ टक्के किंमत वाढीची...

NPPA ANNOUNCES : १ एप्रिलपासून अत्यावश्यक औषध महागणार, ११ टक्के किंमत वाढीची घोषणा

Subscribe

देशात पेट्रोल-डिझेलसह गॅसच्या दरात सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. आता गॅसच्या दरात वाढ झाल्यानंतर ग्राहकांना महागाईचा आणखी एक बूस्टर डोस मिळणार आहे. १ एप्रिलपासून ८०० हून अधिक अत्यावश्यक औषधांच्या किंमतीत ११ टक्क्यांनी मोठी वाढ होणार असल्याची घोषणा नॅशनल फार्मा प्राइसिंग अथॉरिटीने (NPPA) केली आहे.

ज्या औषधांच्या किंमती वाढवण्यात आल्या आहेत त्यांची गणना अत्यावश्यक औषधांच्या श्रेणीत केली जाते. हे औषध NLEM यादीच्या अंतर्गत येतात. राष्ट्रीय आवश्यक औषध यादीचे सुधारित धोरण २०१३ साली लागू झाले. तेव्हापासून, जीवनावश्यक औषधांच्या किमतीत झालेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ आहे.

- Advertisement -

कोणती औषधं महागणार?

अँटीबायोटीक्स, सर्दी-खोकल्याची औषधं, कान,नाक,घशाची औषधं, जंतुनाशक, अँटीसेप्टिक्स, अँटी-इंफ्लेमेटरी ड्रग्स, गॅसच्या औषधांसह ८०० हून अधिक अत्यावश्यक औषधांचा समावेश असणार आहे. ताप आल्यानंतर वापरले जाणारे पॅरासिटामॉल (paracetamol) आणि अॅझिथ्रोमायसीन (Azithromycin) यांचा समावेश आहे. फॉलीक ऍसिड, जीवनसत्त्वे आणि मिनरल्सवर मात करण्यासाठी औषधं देखील या श्रेणीत येतात.

महागाईमुळे किमतीत वाढ

औषधांच्या किंमती वाढण्यामागे घाऊक महागाईत झालेली वाढ असल्याचे सांगितले जात आहे. WPI 2020 च्या तुलनेत २०२१ मध्ये १०.७६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. सरकारी आकडेवारीनुसार, घाऊक महागाईवर आधारित घाऊक किंमत एक वर्षापूर्वीच्या तुलनेत २०२१ मध्ये १०.७६ टक्क्यांनी बदलला आहे. या आधारावर कंपन्यांना या औषधांच्या किमती वाढवण्याची परवानगी देण्यात आली आहे.

- Advertisement -

हेही वाचा : IPL 2022 : आयपीएलमध्ये गुजरात टायटन्स-लखनऊ सुपर जायंट्स पहिल्यांदाच मैदानात, लखनऊवर गोलंदाजांचा भेदक मारा


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -