घरठाणेडोंबिवलीत ढोल ताशांच्या गजरात नववर्ष स्वागत यात्रा

डोंबिवलीत ढोल ताशांच्या गजरात नववर्ष स्वागत यात्रा

Subscribe

बाईक रॅली खास आकर्षण

यंदा डोंबिवलीत गुढीपाडव्याच्या दिवशी परंपरेप्रमाणे निघणारी नववर्ष स्वागत यात्रा काढण्यात येणार आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेली दोन वर्षे या यात्रेला खंड पडला होता. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. मात्र कल्याण डोंबिवलीतील संपूर्ण निर्बंध उठलेले नसले तरीही भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविणारी नववर्ष स्वागत यात्रा यंदा ढोल ताशांच्या गजरात निघणार असल्याची माहिती यात्रेचे आयोजक गणेश मंदिर संस्थानने दिली.

गुढीपाडव्याच्या दिवशी नववर्ष स्वागत यात्रा काढण्याची प्रथा डोंबिवलीच्या गणेश मंदिर संस्थानाने 1999 मध्ये सुरु केली. स्वागत यात्रेच्या पूर्वसंध्येपासून स्वागत यात्रेच्या मार्गावर रांगोळ्या काढल्या जायच्या. ठिकठीकाणी गुढ्या उभारल्या जायच्या. डोंबिवली पश्चिमेतील भागशाळा मैदान येथून या स्वागत यात्रेला सुरुवात होत असे. या यात्रेत श्री गणरायांची पालखी, विविध धार्मिक,सामाजिक,सेवाभावी संस्था, ज्ञाती संस्था आदींचे समाजप्रबोधनपर चित्ररथ या यात्रेचे प्रमुख आकर्षण ठरत होते. तसेच पारंपारिक वेश परिधान केलेले स्त्री, पुरुष ढोल ताशांसह विविध प्रकारच्या वाद्यांच्या गजराने संपूर्ण डोंबिवली दुमदुमून जात होती. स्वागत यात्रेचा समारोप डोंबिवली पूर्वेतील आप्पा दातार चौकात महागुढी उभारून केला जात असे. या यात्रेत अनेक सेलिब्रेटी देखील सहभागी होत असत.

- Advertisement -

चौकाचौकात या यात्रेवर पुष्पवृष्टी होत असे.त्यामुळे डोंबिवलीची स्वागत यात्रा पहाण्यासाठी अनुभवण्यासाठी आजूबाजूच्या शहरातील नागरिक देखील मोठ्या प्रमाणावर येत होते.त्यानंतरच्या काळात कल्याण, ठाणे, मुंबईतील गिरगाव,दादरसह राज्यातील अनेक शहरात स्वागत यात्रा सुरु झाल्या. अगदी सातासमुद्रापार देश विदेशात देखील नववर्ष स्वागत यात्रा निघू लागल्या.मार्च 2020 मध्ये संपूर्ण जगभरात कोरोनाने थैमान घालण्यास सुरुवात केली. अखेर संपूर्ण देशासह संपूर्ण जग लॉक डाऊन झाले. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेली दोन वर्षे या नववर्ष स्वागत यात्रेला खंड पडला. आता कोरोनाचा प्रादुर्भाव बर्‍यापैकी कमी झाला आहे. मात्र कल्याण डोंबिवलीतील निर्बंध पूर्णपणे उठवले गेले नसले तरी सर्व परवानग्या घेवून स्वागत यात्रा काढण्यात येणार असल्याची माहिती गणेश मंदिर संस्थानचे अध्यक्ष राहुल दामले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या यात्रेट यंदा बाईक रॅली सर्वांचे आकर्षण असणार आहे. यात्रेच्या मार्गावरील चौकाचौकात ढोल ताशांचा गजर होणार आहे. या यात्रेतून भारतीय संस्कृतीचे दर्शन घडणार आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने संस्कार भारतीच्यावतीने 75 कलाकार डोंबिवलीतील 10 धार्मिक स्थळे आणि महापुरुषांच्या पुतळ्याजवळ रांगोळ्या साकारणार आहेत. तसेच गणेश मंदिरात 29 मार्च ते 16 एप्रिल पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या पत्रकार परिषदेस गणेश मंदिर संस्थानाचे पदाधिकारी अलका मुतालिक , शिरीष आपटे,सुहास आंबेकर, मंदार हळबे आदी उपस्थित होते.

- Advertisement -

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -