घरक्रीडाIPL 2022 GT Vs LSG : शुभमन गिलची भन्नाट कॅच, ३० मीटर...

IPL 2022 GT Vs LSG : शुभमन गिलची भन्नाट कॅच, ३० मीटर उलटा धावत घेतली लुईसची कॅच

Subscribe

आयपीएलमध्ये पहिल्यांदाच गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात वानखेडेवर सामना सुरु आहे. या समान्यात गुजरात टायटन्सच्या शुभमन गिलने त्याच्या फिल्डिंगने सर्वांना चकीत करुन ठेवलं आहे. गीलने चौथ्याच मॅचमध्ये भन्नाट कॅच घेत ‘कॅच ऑफ द टुर्नामेंट’वर आपला दावा ठोकला आहे.

पहिलाच सामना खेळणाऱ्या गुजरात आणि लखनऊ संघावर सर्वांच्या नजरा आहेत. तथापि, गुजरात टायटन्सने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. लखनऊची सुरुवात अत्यंत खराब झाली. कर्णधार केएल राहुलला मोहम्मद शामीने पहिल्याच चेंडूत बाद केलं. त्यानंतर आलेला इविन लुइस संघाला सावरण्याच्या आधीच गिलने त्याचा अप्रतिम असा कॅच घेत त्याला तंबुचा रस्ता दाखवला. चौथ्या षटकांत वेगवान गोलंदाज वरुण एरॉनच्या शॉर्ट चेंडूवर लुईसने पुल शॉट मारला. त्याने मारलेला चेंडू डीप मिडविकेटला उंच उडाला. मिडविकेटवर फिल्डिंग करत असलेल्या गिलने ३० मिटर उलटा धावत भन्नाट कॅच घेतला.

- Advertisement -

लखनऊचं गुजरातसमोर १५९ धावांचं लक्ष्य

नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा गुजरात टायटन्सचा निर्णय सार्थकी ठरला. वेगवान अनुभवी गोलंदाज मोहम्मद शामीने लखनऊला सुरुवातीलाच धक्के दिले. दीपक हुड्डा आणि आयुष बदोनी यांच्या अर्धशतकाच्या जोरावर लखनऊला १५८ धावांचं लक्ष्य गुजरातसोर ठेवता आलं. तथापि, गुजरातकडून मोहम्मद शामीने ३ आणि एरॉनने २ गडी बाद केले.

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -