घरमहाराष्ट्रसोमेश्वर मंदिरात त्रिपुरारी दीपोत्सव

सोमेश्वर मंदिरात त्रिपुरारी दीपोत्सव

Subscribe

दिवाळीनंतरही ज्या दिवशी घरोघरी दीपोत्सव साजरा केला जातो,तो दिवस म्हणजे त्रिपुरारी पोर्णिमा. त्रिपुरा नामक राक्षसाच्या वधानंतर देवांनी श्री क्षेत्र भीमाशंकर आणि चास सोमेश्वर मंदिरात दीपोत्सव साजरा केला होता आणि तीच परंपरा आजही पाहायला मिळते अशी आख्यायिका सांगितली जाते.बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक श्री क्षेत्र भीमाशंकर चास येथील सोमेश्वर या ठिकाणचा हा दीपोत्सव डोळे दिपवून टाकतो. ‘चास’ गावच ग्रामदैवत असलेल्या श्री सोमेश्वराचे मंदिर प्राचीन काळीन मंदिर आहे. या मंदिराच्या प्रांगणात उभ्या असलेली भव्य दीपमाळ सर्वत्र लख्ख उजळून निघत आहे आणि हा दीपोत्सव दिसावा म्हणून सर्व लाईट्स बंद केले जातात. तर तिकडे बारा ज्योतिर्लिंग म्हणून ओळखल्या जाणार्‍या श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर व परिसरात रांगोळी काढून शिवलिंग फुलमाळ्यांनी सजविले जाते. सर्वत्र हजारोंच्या संख्येने दिवे लावले जातात.

त्रिपुरा पोर्णिमेची आख्यायिका सांगायची झाली तर तारकासुर नावाचा असुर होता. त्याला ताराक्ष, कमलाक्ष व विद्युन्माली असे तीन पुत्र होते. तारकासुराच्या या तीन पुत्रांनी देवादिकांना छळण्यास सुरुवात केली. हा प्रकार असह्य झाल्याने महादेवांनी त्यांच्याशी संग्राम करून त्या तिन्ही पुत्रांचा म्हणजे त्रिपुरांचा बिमोड केला. त्यावेळी आजच्या दिवशी असुरशक्तीचा नाश झाल्यामुळे देवांनी दीपोत्सव केला होता हीच परंपरा आजही तशीच सुरू आहे. या शिवमंदिरात देशभरातून अनेक भाविक पंडित या ठिकाणी हजेरी लावतात.त्रिपुरा पोर्णिमा एक निमित्त आहे. मात्र, प्रकाशाला नेहमीच जगण्याची ऊर्जा देणारा स्त्रोत मानला जातो. त्याचबरोबर वाईट प्रवृत्तीवर चांगल्या प्रवृत्तीने केलेली मात हेही या दीपोत्सवाचे गमक आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -