घरताज्या घडामोडीतुकाराम मुंढे इन Action; बेजबाबदार नऊ कर्मचाऱ्यांना तात्काळ केले निलंबित

तुकाराम मुंढे इन Action; बेजबाबदार नऊ कर्मचाऱ्यांना तात्काळ केले निलंबित

Subscribe

नागपूर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कोरोना विषाणूच्या या महासंकटाच्या काळात बेजबाबदार असलेल्या नऊ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबित केले आहे. यात पाच सफाई कर्मचाऱ्यांची देखील समावेश आहे. शुक्रवारी तुकाराम मुंढे यांनी महापालिका मुख्यालय आणि सफाई कर्मचारी हजेरी लावत असलेल्या विभागाला सकाळी ६ वाजता अचानक भेट दिली. या मुख्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराला लागूनच २४ तास सुरू असणारे कोरोना नियंत्रण कक्ष आहे. या नियंत्रण कक्षामध्ये रात्री कर्तव्यावर असलेल्या चार कर्मचाऱ्यांना नेमून दिलेली जबाबदार व्यवस्थित पार पडत नसल्याचे दिसून आले. यामुळे तुकाराम मुंडे यांनी किशोर कहाते, मनोज तांगडे, प्रशांत डाहाळ, सुनील लोहकरे यांनी तात्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले.

तसेच मुंढे यांनी पाचपावली, इंदोरा, धरमपेठ हजेरी शेडला देखील भेट दिली. यावेळी देखील धरमपेठ झोनचे प्रभारी झोनल आरोग्य अधिकारी जयवंत जाधव, नेहरूनगर झोन क्रमांक ५ चे राजेंद्र सोनटक्के, आशीनगर झोन क्रमांक ९ चे स्वच्छता निरीक्षक संजय पोटे, आशिक बनसोड आणि मंगळवारी झोन क्रमांक १० चे दिनेश करोसिया यांना निलंबित करण्याच आदेश दिले.

- Advertisement -

राज्यासह नागपूर शहरात देखील दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. या वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये लॉकडाऊनबाबत महापौर आणि आयुक्तांचे एक मत झाले. लॉकडाऊनबाबत महापौरांनी बैठक बोलावलेली. या बैठकीत नागपूरचे महापौर संदीप जोशी आणि नागपूर महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे दोघेही उपस्थित होते. दरम्यान, मागील काही दिवसांमधील संघर्षानंतर पहिल्यांदाच ते एकत्र असून कोरोना नियंत्रणासाठी नागपूरमध्ये दोन दिवसांसाठी जनता कर्फ्यू लावण्याचा त्यांनी निर्णय घेतला. त्याचप्रमाणे पुढील ४ दिवस लोकप्रतिनिधी रस्त्यावर येतील असेही निश्चित करण्यात आले आहे.


हेही वाचा – Corona Update: चिंतेत वाढ; देशात कोरोना बळींच्या संख्येने ओलांडला ३१ हजारांचा टप्पा!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -