घरमहाराष्ट्रनितेश राणेंविरोधात दोन गुन्हे दाखल, शिवसैनिकांनी वाढवल्या अडचणी

नितेश राणेंविरोधात दोन गुन्हे दाखल, शिवसैनिकांनी वाढवल्या अडचणी

Subscribe

विशेष म्हणजे या प्रकरणात नितेश राणेंनीही प्रतिक्रियाही दिलीय. कोणी कोणाच्या भावना दुखावल्यात याबद्दल विचार केला पाहिजे. हिंदूंच्या भावना दुखावल्याबद्दल शिवसेना कधी माफी मागणार? त्याबद्दल त्यांनी सांगावं, अशी निवेदनं त्यांनी देत राहावं. आम्ही पाहत राहावं, असं काही आहे का?

मुंबई- भाजपचे आमदार आशिष शेलार निलंबित झाल्यापासून शिवसेनेचे नेते आणि आमदार आता नितेश राणेंच्या मागे लागलेत. भाजप आमदार नितेश राणेंविरोधात शिवसैनिकांनी दोन ठिकाणी गुन्हे दाखल केले आहेत. नितेश राणेंनी राणीच्या बागेसंबंधी केलेल्या ट्विटनंतर शिवसैनिकांनी आक्रमक होत थेट वरळी पोलीस स्टेशन गाठून त्यांच्याविरोधात तक्रार दिलीय. तर दुसरीकडे कणकवलीतील हत्येचा प्रकरणात नितेश राणेंचं नाव आल्यानं कणकवली पोलिसांनी नोटीस पाठवलीय.

विशेष म्हणजे या प्रकरणात नितेश राणेंनीही प्रतिक्रियाही दिलीय. कोणी कोणाच्या भावना दुखावल्यात याबद्दल विचार केला पाहिजे. हिंदूंच्या भावना दुखावल्याबद्दल शिवसेना कधी माफी मागणार? त्याबद्दल त्यांनी सांगावं, अशी निवेदनं त्यांनी देत राहावं. आम्ही पाहत राहावं, असं काही आहे का? समस्त हिंदू धर्माचा सातत्याने अपमान करत असल्याबद्दल आधी माफी मागावी नंतर माझ्याकडून अपेक्षा करावी,” असंही नितेश राणे म्हणालेत. तसेच शिवसेनेचं सामनाच्या ऑफिसमधलं हिंदुत्व आम्हाला माहीत आहे. शिवसेनेचं भेडीबाजारातील हिंदुत्व असल्याचीही टीकाही त्यांनी केलीय.

- Advertisement -

नितेश राणे म्हणाले की, ‘आमचे मुख्यमंत्री मिस्टर इंडिया आहेत. त्यांनी मिस्टर इंडियाचं घड्याळ बाजूला काढावं आणि आम्हाला कधीतरी दिसावं असं आमचं म्हणणं आहे. अधिवेशनात मुख्यमंत्री नसेल, तर सरकारला आणि विरोधकांना न्याय देणार कोण? राज्याचा मुख्यमंत्री हा प्रमुख म्हणून अधिवेशनामध्ये बसणं हे त्यांचं मूळ कर्तव्य आहे. जर त्यांना जमत नसेल, जे आम्ही ऐकतो, त्यांनी तो चार्ज विश्वास असले तर दुसऱ्यांकडे द्यावा. जर विश्वास नसेल तर आदित्य ठाकरे किंवा रश्मी ठाकरेंकडे चार्ज द्यावा. जे आम्ही ऐकतोय ते लवकर करा.’ महाविकास आघाडीचा मी स्पेशल आमदार आहे, माझ्यावर स्पेशल प्रेम आहे. माझ्याविरोधात ज्या काही नोटीसा टाकतायत हे माझ्यावर टाकलेल्या मेडलसारखे आहेत. विरोधी पक्षाचा आमदार किती चांगल्याप्रकारे काम करतो हे जर बघायचे असेल तर त्याला सरकारकडून किती नोटीसा येतात हे बघायचे असते. त्याच्यामध्ये माझं काम अतिशय चांगलं चाललंय. याचं उत्तम उदाहरण या तुम्हाला नोटीसा दिसतायत. आम्हा लोकांना शिवसेनेच्या टार्गेटची सवय आहे. शिवसेनेच्या टार्गेटला आम्ही भीक घालत नाही.’

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -