घरमहाराष्ट्र"उद्धव ठाकरे मराठा आरक्षणाचे मारेकरी", मुख्यमंत्र्यांचा आरोप

“उद्धव ठाकरे मराठा आरक्षणाचे मारेकरी”, मुख्यमंत्र्यांचा आरोप

Subscribe

मुंबई : मराठा आरक्षणावर बोलण्याचा नैतिक अधिकार उद्धव ठाकरेंना नाही. कारण ते आरक्षणाचे मारेकरी आहेत, असा आरोप राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. मराठा आरक्षणासाठी सर्व 48 खासदारांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी आज पत्रकार परिषदेतून केली आहे. मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरेंच्या मागणीचा खरपूस समाचार घेतला आहे.

मराठा आरक्षणासाठी राज्यातील सर्व खासदारांनी राजीनामे द्यावे, या प्रश्नावर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “मराठा आरक्षणावर बोलण्याचा त्यांना नैतिक अधिकार नाही. कारण मराठा समाजाबद्दल त्यांन किती संवेदना आहेत. हे मराठा समाज आणि आम्हालाही माहिती आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला आरक्षण दिले आणि ते मुंबई उच्च न्यायालयात टिकले. हे आरक्षण टिकवण्याचे काम मी आणि देवेंद्र फडणवीसांनी केले. पण मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात गेले. तेव्हा राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले होते. तेव्हा राज्याचे मुख्यमंत्री आणि उपसमितीचे अध्यक्ष कोण होते. हे सर्वांना माहिती आहे. तुम्ही खरे तर मराठा आरक्षणाचे मारेकरी आहात. उद्धव ठाकरे सरकारला  आरक्षण टिकवता आले नाही. मराठा आरक्षणाचे मारेकरी खऱ्या अर्थाने तुम्ही आहात. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी मराठा समाजावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही”, असा आरोप एकनाथ शिंदेंनी केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – “मराठा आरक्षणावर 48 खासदारांनी राजीनामा द्यावा”, उद्धव ठाकरेंची अपेक्षामुख्यमंत्री पुढे म्हणाले, “मराठा आरक्षण घालवायला तुम्ही जबाबदार आहात. ते आरक्षण मिळवण्याचा राज्य सरकार प्रयत्न करत आहे. त्यासाठी राज्य सरकारने क्यूरेटिव्ह पिटिशन सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. त्यासाठी निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे, न्यायमूर्ती भोसले आणि निवृत्त न्यायाधीश गायकवाड या तिघांची समिती घटित गेली केली असून सर्वोच्च न्यायालायतील याचिकेवर प्रभावीपणे सुरू आहे. तसेच इम्पिरिकल डाटा गोळाकरण्याचे काम युद्धपातळीवर सूचना दिल्या आहेत. आमचे सरकार मराठ समाजाला आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहे.”

हेही वाचा – शिंदे समितीचा अहवाल सरकारने स्वीकारला; नोंदी असलेल्यांना…; चंद्रकांत पाटील यांनी दिली माहिती

- Advertisement -

मराठा समाजाला आरक्षण देण्याची जबाबदारी आमची

उद्धव ठाकरेवर मुख्यमंत्री म्हणाले, “मराठा आरक्षण हे उच्च न्यायालयात टिकले. पण सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर उद्धव ठाकरेंना त्यावर किती लक्ष दिले आणि आरक्षणाचे किती पुरावे दिले. मराठा समाज मागास असल्याचे पुरावे तुम्ही द्याला हवे होते. तिथे तुम्ही कमी पडला आणि अपयशी झाला आहात. हे तुम्ही मुदामुन केले. या सर्व गोष्टी मराठा समाजाला माहिती आहे म्हणून आज त्यांनी मराठा समाजाला भडकवण्याचे काम करू नये. हे सरकार मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत टिकणार आरक्षण देण्याची जबाबदारी आमची आहे. इतर कोणत्याही समाजावर अन्याय न करता मराठा समजाला आरक्षण देणार आहेत. आरक्षणासाठी आमचे काम युद्धपातळीवर सुरू असल्यामुळे उद्धव ठाकरेंच्या पायाखालीची वाळू सरकली आहे.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -