घरमहाराष्ट्रउद्धव ठाकरे आज स्वीकारणार मुख्यमंत्री पदाचा पदभार

उद्धव ठाकरे आज स्वीकारणार मुख्यमंत्री पदाचा पदभार

Subscribe

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली असून ते आज दुापारी १ वाजता आपल्या मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारणार आहेत.

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक निकालानंतर जवळपास महिनाभर रंगलेल्या राजकीय नाट्यानंतर अखेर महाराष्ट्रात शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या ‘महाआघाडी’चे सरकार आले आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून गुरुवारी शपथ घेतली असून ते आज आपल्या पदाचा १ वाजता कार्यभारही स्वीकारणार आहेत. त्यामुळे आता दोन दिवसात मुख्यमंत्री कोणत्या घोषणा करणार. शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ करणार का? हे पाहाव लागणार आहे.

- Advertisement -

काय म्हणाले मुख्यमंत्री?

‘शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शपथ घेताना म्हणाले की, मी महाराष्ट्राच्या जनतेला नमस्कार करतो आणि विश्वास देतो की हे सरकार सर्वसामान्य माणसाचे सरकार असेल. राज्यात कुणालाही दहशत वाटेल असे वातावरण हे सरकार राहू देणार नाही. तसेच मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांची पहिली जी बैठक झाली त्यानंतर मला खरंच एका गोष्टीचा आनंद आहे. पहिला प्रस्ताव अभिमान वाटावा असाच आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रायगड किल्ल्याचे संवर्धन करण्यासाठी २० कोटींचा निधी मंजूर करण्यात आले. अभिमान वाटावा अशीच ही बाब आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

अजित पवारांना मुख्यमंत्रीपद हवंय?

उद्धव ठाकरे यांच्यासोबत गुरुवारी एकूण ६ मंत्र्यांनी शपथ घेतली. त्यामध्ये काँग्रेसचे बाळासाहेब थोरात-नितीन राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ-जयंत पाटील आणि शिवसेनेचे एकनाथ शिंदे-सुभाष देसाई यांचा समावेश आहे. मात्र, त्याआधीच अजित पवारांनी सकाळी नॉट रिचेबल होत नाराजीनाट्याचा श्रीगणेशा केला. अजित पवार यांना थेट मुख्यमंत्रीपदच अडीच वर्षांसाठी हवं असल्याची माहिती सूत्रांनी दिली, असे असताना आता दोन्ही काँग्रेसमध्ये अध्यक्षपद आणि उपमुख्यमंत्रीपदावरून देखील धुसफूस सुरू असल्याचे समजतेय.

- Advertisement -

हेही वाचा – उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळातील सहा कॅबिनेट मंत्री


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -