घर महाराष्ट्र उद्धव ठाकरेंनी सांगितला बाळासाहेबांबद्दलचा 'तो' किस्सा, वाचा...

उद्धव ठाकरेंनी सांगितला बाळासाहेबांबद्दलचा ‘तो’ किस्सा, वाचा…

Subscribe

गॅस सिलेंडरच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांनी देखील केंद्रावरती निशाणा साधलेला आहे. यावेळी त्यांनी 2012 चा किस्सा सांगत बाळासाहेबांनी त्यांना नेमके का झापले होते? याबाबत सांगितले.

मुंबई : काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील सणांच्या पार्श्वभूमीवर गॅस सिलेंडरचे भाव 200 रुपयांनी कमी केले आहे. ज्यामुळे सामान्य नागरिकाच्या खिशाला थोडाफार का असेना परंतु दिलासा मिळालेला आहे. परंतु याच मुद्द्यावरून विरोधकांनी नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधलेला आहे. पाच वर्षांची लूट केल्यानंतर अवघे 200 रुपये कमी करण्याला अर्थ काय? असे प्रश्न विरोधकांकडून उपस्थित करण्यात येत आहे. परंतु आता याच मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांनी देखील केंद्रावरती निशाणा साधलेला आहे. यावेळी त्यांनी 2012 चा किस्सा सांगत बाळासाहेबांनी त्यांना नेमके का झापले होते? याबाबत सांगितले. (Uddhav Thackeray told ‘that’ story about Balasaheb Thackeray)

हेही वाचा –  Uddhav Thackeray : घराणेशाहीच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंची पंतप्रधान मोदींवर टीका, म्हणाले…

- Advertisement -

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ऐन गणपतीमध्ये संसदेचे विशेष अधिवेशन बोलविण्यात आलेले आहे. परंतु यावरून एक किस्सा आठवतो. तो म्हणजे, 2012 हे वर्ष होते. तेव्हा सुषमा स्वराज यांनी मला फोन केला. भारत बंद करायचा आहे, असे त्यांनी सांगितले. मी बाळासाहेबांना विचारले, तेव्हा ते मला म्हणाले गणपतीच्या दिवशी? छट् त्यांना सांगून टाक आम्ही गणपतीचा सण असताना भारत बंद वगैरे काही आंदोलन करत नाही. मला चांगलं आठवतं आहे कारण त्यावेळी माझी अँजिओप्लास्टी झाली होती. त्याही वेळा गणपतीच्या दिवसात यांनी भारत बंद केला होता. मी त्या आंदोलनाला गेलो आणि दुसऱ्या दिवशी माझा फोटो आला गॅस सिलिंडर हातात घेतलेला दिसत होता. त्यानंतर मला बाळासाहेबांनी झापले. अरे तुझी अँजिओप्लास्टी झाली आणि तू सिलिंडर कसा काय घेतलास हातात. बाळासाहेब माझ्यावर चिडलेच होते. मग मी त्यांना सांगितले जरा थांबा माझे ऐका. अहो तो थर्माकोलचा सिलिंडर होता, असे मी बाळासाहेबांना सांगितले. मग ठीक आहे असे बाळासाहेब मला म्हणाले होते.

2012 मध्ये भाजपाने गॅस सिलिंडरचे आंदोलन गणपतीच्या दिवसात केले होते. त्यावेळी गॅसचा दर काय होता? आज काय आहे? बघा. पाच वर्षे लुटायचे आणि दोनशे रुपयांची सूट द्यायची. हे सगळे जुमले आहेत त्यावर यांनी इमले बांधले आहेत जे आपल्याला मोडून काढायचे आहेत, असेही उद्धव ठाकरे यांच्याकडून पदाधिकाऱ्यांना सांगण्यात आले. तसेच, सध्याच्या सरकारने गॅस सिलिंडरची किंमत 200 रुपयांनी कमी केली आहे. मात्र त्या गॅसवर तुम्ही शिजवणार काय? कारण भाजीपाला महाग झालाय, डाळी महाग झाल्या आहेत. या सरकारने महागाई प्रचंड वाढवली आहे. हेच भाजपाचे लोक 2012 मध्येही सिलिंडरच्या दरांविरोधात आंदोलन करत होते, असेही त्याच्याकडून यावेळी सांगण्यात आले.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -