Eco friendly bappa Competition
घर उत्तर महाराष्ट्र मोबाईल काढून ठेवायचे 'फरशी'; 'फ्लिफकार्ट'च्या असंख्य ग्राहकांची फसवणूक

मोबाईल काढून ठेवायचे ‘फरशी’; ‘फ्लिफकार्ट’च्या असंख्य ग्राहकांची फसवणूक

Subscribe

नाशिक : फ्लिफकार्ट कंपनीमध्ये ग्राहकांनी ऑर्डर केलेल्या मोबाईलचा परस्पर अपहार करणार्‍या रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला असून, फ्लिफकार्टमधील कामगारांचे रॅकेट उघडकीस आणले आहे. मोबाईल काढून घेत फरशी ठेवून कंपनीला परत पार्सल देणार्‍या पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून ३ लाख सहा हजार ५८२ रुपयांचे १० मोबाईल जप्त केले.

फ्लिफकार्ट कंपनीतून डिलिव्हरीकरीता आलेले आय फोन कंपनीचे व इतर कंपनीचे ५१ मोबाईलचा त्यांचे कंपनीमध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून काम करणारा संशयित बळीराम रावजी खोकले याने मोबाईल डिलिव्हरी न करता परस्पर लंपास केले होते. याप्रकरणी गंगापूर पोलीस स्टेशन येथे फ्लिफकार्ट कंपनीचे संलग्न असलेली इस्टाकार्ड कंपनीचे नाशिक शाखेचे मॅनेजर नामे दिनेश ज्ञानेश्वर पाटील (वय २९) यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट एकने तपास सुरु केला.

- Advertisement -

ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, सहायक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, विष्णू उगले, सहायक पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागूल, सुरेश माळोदे, किरण शिरसाठ, पोलीस हवालदार प्रदिप म्हसदे, जनार्दन सोनवणे, योगीराज गायकवाड, धनंजय शिंदे, नाजीम पठाण, पोलीस नाईक महेश साळुंके, प्रशांत मरकड, विशाल देवरे, विशाल काठे, पोलीस अंमलदार अमोल कोष्टी, जगेश्वर बोरसे, मुक्तार शेख यांनी केली.

असे करायचे मोबाईल लंपास

पोलीस उपनिरीक्षक उगले यांना संशयित बळीराम खोकले हा कंपनीत कधी कामास नव्हता, त्यांच्या नावाचा वापर करून अनोळखी व्यक्तीने गुन्हा केला आहे. त्यावर तपासात धक्कादायक माहिती समोर आली. कॅशिफाय या ऑनलाईन जुने मोबाईल खरेदी विक्री कंपनीत काम करणारा संशयित निखील पाथरवट व कॅशिफाय कंपनीमध्ये पूर्वी काम करणारा आकाश शर्मा यांनी एकत्र मिळून फ्लिफकार्ट कंपनीचे नाशिक विभागातील संलग्न असलेल्या इस्टाकार्ड कंपनीचे एच. आर विभागात काम करणारा निखील मोरे यांच्याशी संगनमत केले. त्यांच्या ओळखीचा वापर करत अमोल खैरे यास कंपनीमध्ये बळीराम खोकले नावाने कामास लावले होते. त्यानंतर बळीराम खोकले नावाने काम करीत असलेला अमोल खैरे हा कंपनीमध्ये आलेले मोबाईलचे पार्सल डिलिव्हरीसाठी बाहेर घेऊन जात असे.

मोबाईलच्या वजनाची ठेवायचे फरशी

- Advertisement -

 आकाश शर्मा व निखील पाथरवट त्यामधील मोबाईल काढून घेवून त्यात मोबाईलच्या वजनाची फरशी टाकून तो पुन्हा पॅक करत असे. पार्सल ग्राहकांची डिलिव्हरी न झाल्याचे सांगून ते पार्सल पुन्हा कंपनीत जमा करायचे, अशा पध्दतीने अपहार करून काढलेले मोबाईल निखील पाथरवट विक्री करायचा.

असे आले रॅकेट उघडकीस

कंपनीमध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून कंपनीत काम करणारा शुभम नागरे यास देखील सहभागी करून त्यानेही कंपनीत आलेले काही मोबाईल काढून निखील पाथरवट यास विक्रीस दिले. या सर्व कामात त्यांना एच. आर विभागात काम करणारा निखील मोरे मदत करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. तपासात फ्लिफकार्ट कंपनीतीचे पार्सल डिलिव्हरी करणारी संलग्न कंपनी इन्टाकार्ड कामगारच करीत असल्याचे व त्याचे रॅकेट असल्याचे उघडकीस आले. त्यावर गुन्हा करणार्‍यांचा शोध घेवून पाच जणांना अटक केली. तपासात त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विष्णू उगले करत आहेत.

आरोपी निघाला पुण्यातील गुन्हेगार

आकाश गोविंद शर्मा हा पुण्यातील सराईत तडीपार गुन्हेगार आहे. तो सध्या भोसरी पोलीस स्टेशनच्या गुन्हयात मोक्का कायदयान्वये अटकेत होता. त्यास न्यालयाकडून ताबा घेऊन गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.

असे आहेत आरोपी

आकाश गोविंद शर्मा (वय २४, रा. संत तुकाराम नगर, मातोश्री पार्क, भोसरी, पुणे), शुभम विनायक नागरे (वय २७, रा. गिताई निवास, पिंपळगाव बहुला, सातपूर, नाशिक), निखील मंगलदास पाथरवट (३२, रा. श्रीयोग अपार्टमेंट, पाथर्डी रोड, नाशिक, निखील सतीष मोरे (३०, रा. तिडके नगर, टवाडी, नाशिक, अमोल शिवनाथ खैरे (धारण केलेले नाव बळीराम रावजी खोकले) २३, रा. म्हाडा कॉलनी, फ्लॅट नं. ३०२, नाशिक) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

- Advertisment -