घरमहाराष्ट्रमुंब्र्यातून उद्धव ठाकरेंचा ताफा माघारी; शाखा स्थळी जाण्यास पोलिसांनी रोखलं!

मुंब्र्यातून उद्धव ठाकरेंचा ताफा माघारी; शाखा स्थळी जाण्यास पोलिसांनी रोखलं!

Subscribe

मुंबई : उद्धव ठकारे ठाकरे मुंब्र्यातील शाखा स्थळी पोहचले असताना त्यांना शाखा स्थळी जाण्यास पोलिसांनी रोखलं.  यावेळी उद्धव ठाकरे यांनी पोलिसांशी संवाद साधला. यावेळी पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना पुन्हा एकदा वाहनातच बसण्याची विनंती केली. त्यांनतर काही वेळेनंतर उद्धव ठाकरेंचा ताफा शाखा स्थळी पोहचला खरा मात्र, त्यांना बॅरिकेट्सपर्यंतच पोहचता आले.  यावेळी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून उद्धव ठाकरेंच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले. (Uddhav Thackeray’s convoy withdraws from Mumbra Police stopped going to the branch!)

मुंब्र्यातील शिवसेना शाखेवरून शिंदे आणि ठाकरे गट आमनेसामने आल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. शिवसेनेच्या मुंब्रा येथील शाखेचा हा वाद असून, ही शाखा शिंदे गटाने ताब्यात घेतल्यानंतर आज उद्धव ठाकरे यांनी ताब्यात घेतलेल्या शाखा स्थळी जाण्यास रोखलं. यावेळी उद्धव ठाकरे आणि इतर नेत्यांनी पोलिसांशी संवाद साधत आम्हाला शाखा स्थळी जायाचे अशी मागणी केली. यावेळी पोलीस आणि उद्धव ठाकरेंच्या सुरक्षा रक्षकांच्या गराळ्यात उद्धव ठाकरे शाखा स्थळी पोहचले खरे. मात्र, त्यांना बॅरिकेट्सपर्यंत जाता आले. यावेळी उद्धव ठाकरेंनी बॅरिकेट्जवळूनच शाखेची पाहणी केली.

- Advertisement -

हेही वाचा : उत्तर महाराष्ट्र, विदर्भाकडे जाणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; मध्य रेल्वेकडून अधिक गाड्यांचे नियोजन

काय घडले आज दिवसभर…

मुंब्राच्या शाखेला भेट देण्यासाठी उद्धव ठाकरे दुपारी तीन वाजता मातोश्रीतून रवाना झाले होते. ते ठाण्यातील आनंदनगरच्या टोलनाक्यावर पोहचल्यानंतर त्यांचे स्वागत करण्यात आले आहे. याआधी पोलिसांनी मुंब्र्यात उद्धव ठाकरे यांना अडवणार नाही, पोलिसांनी बजावलेली 144 ची नोटीस मागे घेतली असे जाहीर केले होते.

- Advertisement -

हेही वाचा : दिवाळीत गावी जाताय, सावधान : सूरत रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी; एकाचा मृत्यू

विजय वडेट्टीवारांनी केली होती सरकारवर टीका

उद्धव ठाकरेंना येण्यासाठी मज्जाव घातल्याचे वृत्त समजल्यानंतर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले की, सरकार घाबरल्याचे हे लक्षण आहे, शासकीय यंत्रणेचा आणि पोलिसांचा दुरुपयोग करणे सुरू झाला आहे, हेच मुंब्य्राच्या घटनेवरून सिद्ध झाला आहे, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. लोकशाहीमध्ये कोणत्याही नेत्यांना स्वतःच्या विचारापासून थांबवणे हा लोकशाहीचा गळा घोटने आहे आणि ते काम राज्यात सुरू झाला की काय अशी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे, असंह वडेट्टीवार म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -