घरक्राइम"ललित पाटीलसह सर्व आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करा", रवींद्र धंगेकरांची मागणी

“ललित पाटीलसह सर्व आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करा”, रवींद्र धंगेकरांची मागणी

Subscribe

पुणे : राज्यात ललित पाटील ड्रग्ज प्रकरणी ससून रुग्णालयाचे डीन डॉ. संजीव ठाकूर आणि एक वैद्यकीय अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणावर पुण्याच्या कसबा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी पुणे पोलिसांवर गंभीर आरोप केले असून या प्रकरणातील आरोपींवर मोकोका अंतर्गत कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी आज माध्यमांशी बोलताना केली आहे.

ललित पाटील प्रकरणात रवींद्र धंगेकर म्हणाले, “मी 17 लाख रुपये देत होतो, असे स्वत: ललित पाटीलने सांगितले आहे. मी दोन दिवसांपूर्वीच तपास अधिकाऱ्यांना भेटलो आणि त्यांनी सांगितले की, आरोपी अधिकाऱ्यांकडून पैसे वसुली करा आणि त्यांना अटक करा, या प्रकरणातील शासनाचा अहवाल शुक्रवारी आला. या प्रकरणी ससून रुग्णालयाचे डीन डॉ. संजीव ठाकूर यांना निलंबित करणे ही एक नौटंकी असून डीनला वाचवण्याचे काम सरकार करत आहे. या प्रकरणातील सर्व आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई झाली पाहिजे,” अशी मागणी केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – मुंब्य्रात ठाकरे-शिंदे गट आमनेसामने; 500 पोलीस, आरपीएफसह दंगल नियंत्रण पथक तैनात

 पोलिसांच्या आशिर्वादाने धंदे सुरू

रवींद्र धंगेकर पुढे म्हणाले, “या प्रकरणात पोलीस व्यवस्थित चौकशी करत नसून पोलीस हे गृहमंत्री आणि सरकारच्या दबावाखाली काम करत आहे. तसेच पुण्यात हुक्का पार्लर, अमली पदार्थ आणि ड्रग्जचे धंदे पोलिकांच्या आशीर्वादाने सुरू आहे. आजही पोलीस आयुक्त कार्यालयात लाखो रुपये हफ्ता गोळा केला होता.”

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -